बिग बॉस मराठी’ सीजन ३ सध्या चांगलाच चर्चेत आहे. घरामध्ये स्वतःच स्थान पक्क करण्यासाठी स्पर्धकांमध्ये मोठी चढाओढ सुरु आहे. त्यामुळे घरात अनेक वादविवाद आणि राडेसुद्धा पाहायला मिळत आहेत. गेली अनेक दिवस घरामध्ये ‘दोस्तीत कुस्ती’ असं वातावरण दिसून येत आहे. घरातील जय-वीरू समजले जाणारे, विकास आणि विशाल यांच्यामध्ये सतत वाद होत असलेला दिसून येत आहे.दरम्यान काल दिवसभर ट्विटरवर
viewers with vikaspatil हा हॅश टॅग ट्रेंड होत होता. पाहूया नेमकं काय घडलं होतं. जस-जसं दिवस वाढत चाललेत तसतसं घरातील वातावरण बदलत चाललेलं दिसून येत आहे.पहिला ए टीम आणि बी टीम असा वाद पाहायला मिळत असे. आता घरातील समीकरणे बदललेली पाहायला मिळत आहेत. एकीकडे बेस्ट फ्रेंड म्हणून वावरणाऱ्या मीरा आणि गायत्री एकमेकींसोबत भांडत आहेत. तर दुसरीकडे जय-वीरू समजले जाणारे विकास पाटील आणि विशाल निकमी हे आपापसांत भांडताना दिसून येत आहेत।
हा वाद कॅप्टन्सी टास्कदरम्यान इतका वाढला कि हे दोघे एकमेकांसोबत हातापायीसुद्धा करू लागले होते. विशाल आणि विकासच्या वादविवादांनंतर विकास पाटील सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. नुकताच घरामध्ये कॅप्टन्सी टास्क पार पडला. यावेळी घरातून नॉमिनेशन टास्क जिंकून जय आणि मीरा हे दोन उमेदवार कॅप्टन्सी उमेदवारी साठी पात्र ठरले होते. अशातच घरातील इतर सदस्यांना या दोघांना कॅप्टन्सी मिळवून देण्यासाठी टास्क खेळायचा होता।
यावेळी बिग बॉसच्या आदेशानुसार घरात २ टीम करण्यात आल्या होत्या. जयच्या टीममध्ये विशाल आणि मीनल होते. तर मीराच्या टीममध्ये विकास आणि उत्कर्ष होते. तर बाकी सदस्य त्यांना प्रोत्साहन देत होते. दरम्यान टास्क जिंकण्यासाठी विकास आणि विशालने प्राण पणाला लावले होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
यावेळी विशालने विकासला टॅकल करत, खाली जमिनीवर पाडलं होतं. तर विकास सुटण्यासाठी धडपड करत होता. मात्र आपल्या फिजिकल स्ट्रेंथच्या जोरावर विशाल यात वरचढ ठरला. त्याने विकासला अजिबात निसटू दिलं नाही. इतकंच नेव्हर तर विकास पाणी प्यायचं आहे म्हणून धडपड बकर्ट होता मात्र विशालने त्याला सोडलं नाही. त्याला टॅकल करूनच पाणी प्यायला दिलं।
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद