बिग बॉस मराठी ३ चा ग्रँड फिनाले पुढे ढकलणार

मराठी टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि चर्चेत असलेला शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’ Bigg Boss Marathi 3. या शोचा तिसरा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. १९ सप्टेंबर रोजी हा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. १०० दिवस विविध स्पर्धक एकाच घरात राहणार आहेत आणि अखेर त्यातून एक स्पर्धक ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार आहे.

हा शो या महिन्यात संपणार होता, मात्र आता पुढील आणखी काही दिवस तो चालणार असल्याची माहिती समोर येत आहे. नुकतेच या शोने ७० दिवस पूर्ण केले आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्यात १०० दिवस पूर्ण होतात. असं असलं तरी १०० दिवसांहून अधिक भाग या शोचे दाखवले जाणार असल्याचं कळतंय. टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, बिग बॉस मराठी ३चा ग्रँड फिनाले हा जानेवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यात पार पडणार आहे.

यंदाच्या सिझनला चांगला टीआरपी मिळत असल्याने हा शो आणखी काही दिवस वाढवल्याचं समजतंय. अगदी पहिल्या दिवसापासून या शोने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. दर आठवड्यात यातील एक स्पर्धक घरातून बाहेर जात आहे. यामध्ये आतापर्यंत दोन वाईल्ड कार्ड एण्ट्री पाहायला मिळाल्या आहेत. आता ११व्या आठवड्यात कोणाचंही एलिमिनेशन होणार नाही. शोमधील टॉप ८ स्पर्धक अकराव्या आठवड्यात घरात सुरक्षित राहतील.

याबद्दलची माहिती अद्याप स्पर्धकांना मात्र देण्यात आली नाही. नुकत्याच पार पडलेल्या भागामध्ये, बिग बॉसच्या शोदरम्यान या आठवड्यासाठी मतदानाच्या लाइन्स बंद झाल्या आहेत, अशी माहिती डिस्क्लेमरमध्ये देण्यात आली. त्यामुळे चाहत्यांनाही आश्चर्य व्यक्त केलं. आतापर्यंत बिग बॉसच्या घरात ८ स्पर्धक असून येत्या काही एपिसोडमध्ये आणखी तीन जणांचं एलिमिनेशन होणार आहे.

ग्रँड फिनालेसाठी पाच स्पर्धक निवडण्यात येणार असून त्यापैकी एक जण बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार आहे. सध्या घरात विशाल निकम, विकास पाटील, मीरा जगन्नाथ, गायत्री दातार, उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे आणि सोनाली पाटील यांच्यामध्ये चुरस रंगली आहे.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *