हा ट्रॅप आहे यात अडकू नका प्रख्यात अभिनेत्री शुभांगी गोखलेंसोबत नेमकं काय घडलं?

प्रख्यात अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. खुद्द शुभांगी गोखले यांनीच फेसबुकवर पोस्ट लिहित याविषयी माहिती दिली आहे. “पुन्हा एकदा माझे अकाऊंट हॅक झाले आहे. माझ्या नकळत सर्वांना मेसेजमध्ये एक लिंक जात आहे. प्लीज ओपन करु नका” असं आवाहन त्यांनी आपल्या फेसबुक फ्रेण्ड्सना केलं आहे. “पुन्हा एकदा माझे अकाऊंट हॅक झाले आहे.

माझ्या नकळत सर्वांना मेसेजमध्ये एक लिंक जात आहे. प्लीज ओपन करु नका. मी सायबर सेलशी बोलले आहे.” असं शुभांगी गोखलेंनी फेसबुकवर लिहिलं आहे. “हा मेसेज गेले अनेक दिवस फेसबुक मेसेंजर वर फिरतोय. कृपया कुणी तुम्हाला ही लिंक पाठवली तर ओपन करू नका. ओपन केलीत तर तुमच्या प्रोफाईलवरून इतरांना मेसेज जातील. ही एक व्हायरस लिंक आहे.

तुम्ही जर क्लिक केलं तर ही लिंक तुम्हाला फेक युट्युब सारख्या दिसणाऱ्या साईटवर घेऊन जाते. जिथे मेसेंजर सारखंच पेज दिसतं, तिथे लॉग इन केल्याशिवाय व्हिडिओ दिसणार नाही असं सांगितलं जातं…हा ट्रॅप आहे यात अडकू नका.” असं आवाहन शुभांगी गोखलेंनी केलंय. याआधीही, अनेक हिंदी-मराठी कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊण्टचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

सध्या फेसबुकवर अनेकांच्या मेसेंजरमध्ये अशा स्वरुपाच्या लिंक येताना दिसत आहेत. मात्र त्यावर क्लिक केल्यास तो मेसेज सर्व फेसबुक फ्रेण्ड्सना जातो. यापासून सावध राहण्याचं आवाहन सायबर तज्ज्ञांनी केलं आहे. अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत साकारलेल्या शकूच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीतच स्थान निर्माण केलं आहे. त्या या मालिका सोडणार असल्याच्याही चर्चा आहेत.

याशिवाय ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेतील त्यांची भूमिकाही गाजत आहे. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या लोकप्रिय मालिकेतील श्यामलची भूमिका त्यांनी अजरामर केली. तर काहे दिया परदेस, एका लग्नाची तिसरी गोष्ट, अग्निहोत्र यासारख्या मालिकांतील त्यांच्या व्यक्तिरेखा गाजल्या आहेत. तर अगंबाई अरेच्चा, बोक्या सातबंडे, झेंडा, स.. सासूचा, क्षणभर विश्रांती, बस्ता अशा अनेक चित्रपटांतही त्या झळकल्या आहेत.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *