मुंबई इंडियन्स होणार मजबूत रोहितसोबत आणखी कोण कोण खेळणार

आयपीएल स्पर्धेच्या पुढील सिझनपूर्वी IPL 2022 होणाऱ्या मेगा ऑक्शनची तयारी सुरु आहे. या स्पर्धेतील जुन्या 8 टीमना 30 नोव्हेंबरपर्यंत रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयला द्यावी लागणार आहे. प्रत्येक टीम जास्तीत जास्त 4 खेळाडू रिटेन करू शकते. दिल्ली कॅपिटल्सनं त्यांची यादी अंतिम केली असून यामध्ये दिल्लीचा माजी कॅप्टन श्रेयस अय्यरचा समावेश नाही।

असं वृत्त आहे. श्रेयसनं 2015 साली आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले. तो दिल्लीच्या टीमचा कॅप्टनही होता. त्याच्याच कॅप्टनसीमध्ये दिल्लीनं 2020 साली आयपीएल स्पर्धेची फायनल गाठली होती. दिल्लीनं यंदा ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल आणि नॉर्खिया यांना रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे श्रेयसचा पुन्हा एकदा लिलावात समावेश होऊ शकतो. तसं झालं तर त्याला मोठी रक्कम मिळणार हे नक्की आहे. ‘टेलिग्राफ’ मधील वृत्तानुसार मुंबई इंडियन्स श्रेयस अय्यरला खरेदी करण्याची योजना तयार करत आहे. पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा आहे. विशेष म्हणजे रोहित आणि श्रेयस हे दोघेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतात.

श्रेयस मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये आल्यास रोहित आणि श्रेयसमधील केमिस्ट्रीचा टीमला फायदा होणार आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तर कायरन पोलार्डसोबत टीमची बोलणी सुरू आहेत. याशिवाय मुंबईची टीम ईशान किशनलाही रिटेन करण्याची शक्यता जास्त आहे.

श्रेयसचा टीममध्ये समावेश झाल्यास त्यांची मिडल ऑर्डर भक्कम होणार आहे. मुंबई इंडियन्ससह आणखी काही फ्रँचायझी देखील श्रेयसला टीममध्ये घेण्यासाठी उत्सुक आहेत. आयपीएल 2022 मध्ये अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नव्या टीम सहभागी होणार आहे. यापैकी एखाद्या टीमचा कॅप्टन म्हणूनही श्रेयसकडं पाहिलं जात आहे.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *