आईसाठी ही गोष्ट बाबा म्हणत होते आता ते नाहीत म्हणून हे काम करून मी आईसाठी हे आणणार डोळ्यात पाणी येईल

दारावरची बेल वाजली म्हणून कोण आले ते बघायला गेलो बघतो तर आमच्या शेजारच्या आणि समोरचे पॅसेजमध्ये उभे होते आणि त्यांच्यासमोर सडपातळ बांध्याचा उंची साधारण चार फूट असलेला तरतरीत नाकाचा हातातून आकाश कंदील घेऊन एक मुलगा उभा होता तो चेहरा ओळखीचा होता हा मुलगा आपल्या इथेच कुठेतरी राहतो हे माहिती होतं कारण रोज सकाळी बिल्डींग खाली शाळेच्या बसची वाट पाहत उभा असतो काय रे काय पाहिजे असं मी विचारलं बरोबरच तो सुरू झाला नमस्कार माझं नाव किशोर आहे

मी नववीत आहे मी तुमच्या एरियामध्ये राहतो या वर्षीपासून मी स्वतः हे कंदील बनवून विकणार आहे माझ्याकडे हे दोन प्रकारचे डिझाईन आहेत हे मी सॅम्पल म्हणून आणले आहेत तुम्हाला पाहिजे तर रंगांमध्ये करून मिळतील त्यामध्ये बल्प लावण्याची सोय सुद्धा व्यवस्थित केली आहेत यामध्ये तुम्हाला छोटा किंवा मोठा आकार हवा असेल तर तसेही करून मिळेल किंमत एकच राहील याची किंमत आहे फक्त 140 रुपये तुम्हाला कोणाला द्यायचे असतील तर सांगा एका काकूने सरळ नाही म्हणून दार लावून घेतलं नववीचा अभ्यासाच बघा

एक काका हा असा फुकटचा उद्देश देऊन गेले मी तर त्याच्या मार्केटिंग स्किल ने अचंबित झालो होतो त्याच्याकडे कौतुकाने बघत होतो दादा तुला घ्यायचा आहे कंदील त्याच्यापेक्षा त्याचे डोळे खूप मोठे अपेक्षेने बोलत होते मी त्याला घरात घेतलं बस रे छान आहे आकाश कंदील हे बघ जर का तू आम्हाला योग्य किंमत सांगशील तर मी तुला माझ्या मित्रांकडून अजून ऑर्डर मिळवून देईल विचार कर खूप लोक घेतील नाही दादा मी फक्त दहाच कंदील करणार आहे कारण माझी परीक्षा पण सुरू आहे शनिवार पर्यंत माझी परीक्षा आहे

आणि रविवारी सगळ्यांना कंदील मिळाले पाहिजे अभ्यास करत मला एक कंदील करायचे आहेत म्हणून दहा च लिमिट ठेवला आहे आणि 140 रुपये फिक्स किंमत दहाच कंदिलांचा बिझनेस आणि त्याचं प्लॅनिंग किती परफेक्ट केलं बघून कौतुक वाटलं होतं मला बर एक खरं खरं सांग एका कंदीला मागे किती खर्च आहे आणि किती प्रॉफिट होणार चाळीस रुपये खर्च आणि शंभर रुपये प्रॉफिट हे त्याने अगदी निरागस पणे खरं सांगितलं वा म्हणजे दहा कंदिलांचे एक हजार रुपये प्रॉफिट कमावणार तू मस्त पण काय रे तुला आकाश कंदिलाचा बिझनेस यावर्षी कसं काय सुचलं केलं

त्याने खूपच अभिमानाने उत्तर दिलं कारण मला या दिवाळीला माझ्या आईला एक साडी गिफ्ट करायची आहेत अरे वा क्या बात है खूपच भारी रे पण हजार रुपयांमध्ये येणार का साडी एकदम साधीच घेणार आहे एकेठिकाणी सेल लागला आहे इथे मी चौकशी केली आहे आठशे पन्नास रुपयाची एक साडी मी बघून ठेवली आहे तशीच घेणार आहे वा वा मस्तच आणि तसंही गिफ्ट मध्ये साधं आणि भारी काहीच नसतं वस्तूच्या किमती पेक्षा त्यामागचं आपलं प्रेम आणि भावना महत्त्वाची आणि जगातल्या सगळ्याच आयांना मुलांची गिफ्ट बेस्टच वाटतात

पण याच दिवाळीत आई आठवली का तुला साडी देण्यासाठी मी थोडं मस्करीत त्याला विचारलं नाही गेल्यावर्षी पर्यंत बाबा आणायचे आईला पण मग बाबा फेब्रुवारीमध्ये गेले म्हणून मी घेणार तिला या वर्षी साडी निशब्द अंगावर सरसरून काटा आणि डोळ्यात पाणी माझ्या त्याच्या आणि कदाचित तुमच्या सुद्धा आयुष्य शिकवून गेला तो त्याने घेतलेली ती साडी 800 ची साडी त्याच्या आईला या दिवाळीतला मोलाचा आनंद देईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *