आज पुण्यात गावातल्या दुकानातले एक दृष्य बघितले एक पाच सहा मुलगा होता उद्यापासुन शारदीय नवरात्र सुरू होते त्यामुळे तिथेतो माती विकत होता घट बसण्यासाठी लोक मातीचा उपयोग करतात दुपारचे साडेबारा वाजले होते ऊन तर खूप होतं हा मुलगा माती विकत कुणात बसला मला राहवलं नाही
मी त्याच्या जवळ गेलो आणि विचारले कशी दिलीस रे माती दहा रुपयाला अर्धा तांब्या आणि वीस रुपयाला दोन भरून तांबे मी बरं म्हटलं आणि विचारलं मग किती विकली माती सकाळपासून त्याचा चेहरा खूपच पडल्या म्हणालास दादा सकाळी साडेआठ वाजता पोहोचलो पण कोणीच आलं नाही
गिराईक तू काय खाल्लं का सकाळपासून म्हटल्यावर त्याच्या डोळ्यातून पाणी आलं म्हणाला दादा आईने सकाळी फक्त अर्धा कप चहा करून दिला फक्त निघताना आई कामाला गेली आणि हे विकल्या शिवाय मला काहीही खायला मिळणार नाही मी लगेच तिथे असलेल्या वडापावच्या गाड्यांवर गेलं
आणि वडापाव खायला दिले मी इथे माझा मोठेपणा काही सांगत नाही पण या वयात त्याचे कष्ट खूपच मोठा आहे असं वाटतंय आणि त्याने पोट भरून आल्याचं समाधान त्याच्या चेहर्यावर दिसलं म्हणाला दादा जातो ते बघा एक गिराईक आलं आणि नकळत माझ्या पाया पडून पळत गेला मला कसंतरीच वाटलं मी लगेच त्याच्या जवळ गेलो
पाय कशाला पडल्यास रे त्यावर तो म्हणाला दादा आईने सांगितले त्याच्यामुळे आपले पोट भरलं त्याला देवाने पाठवलेल असतं आणि देव त्याच्या रूपात येऊन गेलेला असतो माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं एवढ्या कमी वयात खूप कळत होत त्याला उद्यापासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रात देवीला एकच माझं मागणं गरिबीची दरी लवकर मिटव आणि यांना सामर्थ्यवान बनव
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद