पुण्याचा जवळ निगडी प्राधिकरण नावाचा एक मस्त एरिया आहे उच्च मध्यमवर्गीय व गर्भश्रीमंत एरिया म्हणून ती जागा फेमस आहे तरुणाईची अगदी पसंद जागा म्हटलं तर वावगं ठरणार नाही फारशी वर्दळ नसते पण संध्याकाळी चारनंतर इथे क्रूज भरल्यासारखं वातावरण असतं विरंगुळा म्हणून फिरायला येणाऱ्यांची गर्दी जास्त असते इथे भेळ चौकापासून जवळ असलेला दिल्ली स्वार आणि नॅचरल आईस्क्रीम चा चौक बाकीच्या प्राधिकरणाला पेक्षा खास आहे परवा कामानिमित्त तिथे जाण्याचा योग जुळून आला तसं नेहमीच काही ना काही
कामानिमित्त तिथे जाणवतच पण परवा चा तो दिवस काही खास होता संध्याकाळचे चार वाजले असतील मी आणि माझा मित्र कार पार्किंग करून चौकात येऊन उभे राहिलो रस्त्याच्या जवळच असलेल्या स्नॅक सेंटर वाल्याची लगबग चालू होती तव्यावर काहीतरी बनवत होता त्याच्या तडक यामुळे मस्त खमंग वास पसरला होता ज्याला भेटायला आलो होतो त्याला फोनवर कळवलं तो येईल पर्यंत काहीतरी विरंगुळा करावा म्हणून सर्वत्र नजर फिरवली वातावरणात मस्त गारवा बहरत होता दुपारचं ऊन कोवळ्या उन्हासारखे जाणवत होतं फारशी वर्दळ नव्हती वाट पाहावे लागणे
यासारखी सजा कोणतीच नसते म्हणून मोबाईल काढून सोशल मीडियावर रुजू झालो तेवढ्यात एक खणखणीत शिट्टीचा आवाज कानावर पडला म्हणून मी आवाजाच्या दिशेने मान व नजर फिरवली तर आठ-दहा वयाची पाच-सहा मुलांचे टोळकं कोणालातरी बोलवत होतं त्याच्याकडे पाहताच लक्षात आल्यावर प्रधिकरण जवळच असलेल्या झोपडपट्टीतील ही पोर असावेत प्राधिकरणाच्या श्रीमंताच्या मुलांची स्टाईल कॉपी करण्याचा फसलेल्या प्रयत्न वरून ते लक्षात येत होतं भुरकट झालेले रंगीबेरंगी केस गुडघ्यावर फाटलेली जीन्स टी-शर्ट वर बटन लावलेला
शर्ट हातात नानाविध ब्रेसलेट या सर्व तामझाम वरून ते लगेच जाणवत होतं ते त्यांच्या धुंदीत इकडून तिकडे फिरत लोकांना पैसे मागत होते त्यांच्यातल्या एकाने त्यांच्यातल्याच एका शिट्टी मारली होती पण त्यांचा एक मित्र लांब काठीला लावलेले फुगे विकत होता हा विरोधाभास होता बाकींच्या पेक्षा वयाने लहान होता पण पैसे कमवण्यासाठी काहीतरी करत होता हातातला मोबाईल खिशात ठेवून हाताची घडी घालून मी त्यांच्याकडे लक्ष देऊन पहात राहिलो चौकात काही फेरीवाले फेरफटका मारत होते त्यातच ऐक भंगारवाला हातगाडीवर भंगार लादून तिथून दिल्ली सा समोरून समोरून जात होता
फुग्यावाला मित्राने शेट्टीचा आवाज ऐकताच मागे वळून टोळक्याला खुणेनेच काय म्हणून विचारले त्यावर त्यांनी शिट्टी मारली होती भंगारवाल्याला थांबण्याचा इशारा केला त्यांचा हा मूक संवाद मला कळला होता पण काय घडणार होतं हा प्रश्न मात्र मला पडला होता फुगेवाले भंगारवाल्याला थांबून तोपर्यंत या सगळ्यांना गंगने भंगारवाल्याला चारही बाजूंनी घेरलं आणि त्याला काहीतरी मागू लागले लांबून मला काही ऐकू येत नव्हतं म्हणून थोडासा जवळ जाऊन एका कारला टेकून उभा राहिलो ती मुलाला भंगारवाल्याला त्याच्या ठेल्यावर असलेली
लहान मुलाची स्पायडर असलेली कार मागत होते भंगारवाला त्यांना नकार देत होता बहुतेक शंभर रुपये मागत होता जे या मुलांकडे नव्हते त्या कारची कंडिशन खूपच चांगली होती एखाद्या श्रीमंत आणि इलेक्ट्रिक बाइक घेतली म्हणून अडगळीत पडलेली ही कार भंगारात विकली असावी असा मी अंदाज लावून मोकळा झालो बारग्णी मोठ्या प्रमाणात चालू झाला होता सगळ्यांनी अगदी गोंधळ मांडला होता पण भंगारवाला काही न बोलता फक्त मान हलवून नकार घंटा वाजवत होता काही वेळ थांबून त्याने ठेल्याला धक्का मारला आणि पुढच्या चौकाच्या दिशेने निघाला
पण पोर काही त्याची पाठ सोडत नव्हते पुढच्या चौकात पर्यंत माझ्या नजरेने ही त्यांचा पाठलाग केला पण नंतर ही पोरं आणि भंगारवाला दिसेनासा झाला मी मागे वळून पहातच होतो तेवढ्यात त्याला भेटायला आलो होतो त्यांनी हाक मारली समोरच असलेल्या नॅचरल आईस्क्रीम च्या ओपन एरियात आमची मीटिंग सुरू झाली आमचं बोलणं चालू असतानाच मोठमोठ्याने ओरडण्याचा आणि प्लास्टिकच्या चाकांचा घसरण्या चा आवाज कानावर पडला सगळ्यांच्या नजरा त्या दिशेला वळले आणि पाहतो तर काय त्या मुलांनी ती कार भंगार वाल्याकडून घेतली होती
फुगेवाला त्यात बसलेला होता आणि बाकीचे त्याला ढकलत चालत होते त्याच्या चेहर्यावरचा आनंद पाहण्याचे सुख मला लाभलं आणि आपसूकच माझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य एवढा आनंद तर कार घरी घेतल्यावर होत नाही याची प्रचिती मला आली आणि अनुभवी होता छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद काही औरच असतो हे त्या दिवशी पुन्हा एकदा समजलं मिटींग चालू असतानाच ही पोर सगळं विसरून या चौकातून त्या चौकात प्रत्येकाला बसवून फेऱ्या मारत होती पुन्हा मेन चौकात येत होती हा त्यांचा खेळ अर्धा तास चालू होता
नंतर अचानक ही पोरं कुठे गायब झाली कळेच ना म्हणून मी पुन्हा सगळीकडे नजर फिरवली पण कोणीच दिसले नाही तासाभरात मीटिंग सांगतात मी माझ्या कारमध्ये बसून दरवाजा लावणार तेवढ्यात फुगेवाला मागून आला आणि म्हणाला मी घेतो मी त्याला जवळ बोलावलं आणि त्याला म्हणालो फूगा घेतो पण मला सांग गाडी कुठे आहे तुमची त्यावर त्याने डोळे विस्फारून आणि किंचित हसून म्हणाला विकून टाकले मी प्रतिप्रश्न केला का रे त्यावर त्याने सविस्तर उत्तर दिलं गाडीत बसून फिरायचं होतं सगळ्यांना म्हणून 80 रुपायला घेतली होती
आणि मी पैसे दिले होते धंद्यातले घरी घेऊन गेलो असतो तर बापाने मारलं असतं म्हणून परत शंभर रुपये ला विकून टाकली वीस रुपये फायदा झाला मी बघतच राहिलो त्याच्याकडे त्याच्या हातात फुगा घेऊन मागच्या सीट वर ठेवला अन पैसा त्याच्या हातावर ठेवली त्यांनी उरलेले पैसे परत करतो तो उड्या मारत निघून गेला पण गाडी चालवताना खूप वेगळा अनुभव येत होता घरी येताना मागच्या सीट वर ठेवलेला फुगा मीरर मधून दिसताच जणू तोच मागे बसलो आहे आणि त्याचा हसरा चेहरा डोळ्यासमोरून दिसत होता आणि मनात एकच वाक्य होतं आनंद शोधावा लागत नाही
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद