आज तिची पार्टी खूपच उशिरा संपली तशी ती पार्टीत रमणारी नव्हती वडील शाळेत शिक्षक शिकवण्याची आवड म्हणून आणि समाजसेवेची आवड म्हणून रात्र शाळेतही शिकवायचे मैत्रिणींनी आग्रह केला म्हणून पार्टीला गेले चला आता गाडी गाठायला हवी विटी स्टेशनवर आली कल्याण गाडी मिळाली रात्र फार झाली होती म्हणून लेडीज डब्बा नको म्हणून जेन्ट्स डब्यात शिरली माणसे हि कमी होती
तेवढ्यात एक दारुड्या डब्यात शिरला अगदी अजागळ तिच्या समोरच बसला तिच्याकडे पहात होता ती मनातून घाबरली गाडी पुढे जात होती ठाण्यापर्यंत दोघे तिघेच उरले तिला भीती वाटत होती जात होती पण डोंबिवलीला उतरले तर काय कल्याण पर्यंत कसे जायचे समोर तो बसला होता ते उतरले तर आपण ही उतरू डबा बदलू पण ते उतरले नाही बहुदा कल्याण तेच असावे तिला हायसे वाटले कल्याण आले
एकदम लक्षात आले की आज रिक्षा संप चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता ती निघाली तो तिच्या मागेच होता आता मात्र ती खूप घाबरली रस्त्याच्या कडेला काही माणसे झोपली होती एरवी त्यांना ती घाबरली असती
पण आज मात्र त्यांचाच तिला आधार वाटला तो मात्र ठराविक अंतर ठेवून तिच्या मागे होता मेन रोड गेला तिचे घर गल्लीबोळात होते तिथे मात्र अंधार जास्त आता मात्र त्याने दोघांमधले अंतर कमी केले
घर दिसल्यावर ती धावतच निघाली बेलवर बेल दाबत राहिली आतून वडिलांचा आवाज अग हो हो किती बेल वाजवते दार उघडताच ती घरात शिरली अगं किती उशीर केलास तिने उत्तर दिले नाही
घटाघट पाणी प्यायली तेवढ्यात बेल वाजली तिच्या मनात धस झाले वडिलांनी दार उघडले तोच उभा होता वडिलांनी मी विचारलं कोण पाहिजे त्याने वडिलांना वाकून नमस्कार केला
सर मी तुमचा रात्र शाळेतला विद्यार्थी घरची आणि सभोवतालची परिस्थितीमुळे दारू प्यायला लागलो पण मूळ संस्कार तुमचे आहेत तुमच्या परिवाराला कोण ओळखत नाही
पण माझी ही अशी अवस्था तुमच्या मुलीशी बोललो असतो तर तिचा विश्वास बसला नसता म्हणून हा उपद्व्याप तिला सांगा इतक्या रात्री एकटी येऊ नकोस दिवस वाईट आहेत आणि प्रत्येक वेळेस तुमच्या हाताखालून गेला विद्यार्थी रखवालदार म्हणून मिळेल असे नाही
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद