75 ते 80 वर्षाची एक भिक्षेकरी आजी तिला आम्ही भेटण्याचा वार ठरलेला मंगळवार काही महिन्यांपूर्वी तिने माझा फोन नंबर घेतला होता या आजीला तपासण्यासाठी मी न चुकता मंगळवारी ठरलेल्या ठिकाणी जातो तरीही ती आदल्या दिवशीच्या सोमवारी रस्त्यावरून येणार्या जाणार्या लोकांना मला फोन करायला लावते आणि एकच प्रश्न उद्या येणार ना किती वाजता वाट बघते बर का दर वेळी हो ग म्हातारे म्हणून मी प्रत्येक फोन ला उत्तर देत असतो 6 सप्टेंबरच्या सोमवार सुद्धा असेच 6 7 कॉल आले प्रत्येक वेळी हो मी येणार आहे असं सांगितलं
तरी तिचे कॉल चालूच होते गाडी चालवत असताना एक कॉल घेताना मरता मरता वाचलो मला तिचा खुप राग आला 7 सप्टेंबर मंगळवार आजी भेटल्यानंतर मी तिची चांगलीच खरडपट्टी काढली तुला कळतं का ग म्हातारी वेडी आहेस का दर वेळे तो म्हणतो तरी किती वेळा किती जणांच्या फोनवर कॉल करतेस मेलो असतो ना काल तुझा कॉल घेता घेता आता इथून पुढे कधीच मला कधी तू कॉल करायचा नाही समजलं रागात खूप काही बोललो तिला तिचा चेहरा पडला बाजूला जाऊन डोळ्यांना पदर लावून बसली नंतर मग मलाच वाईट वाटलं मी पुन्हा जाऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला
आजी बोलायला तयार नव्हती दुसरीकडे तोंड करून बसली खेळीमेळीने गंमत करत मी आजी चा सुरकुतलेला हात पकडला म्हणालो जाऊ दे ना म्हातारे सोड की राग आता मी पकडलेला हात तिने इतक्या जोराने धरला की त्यात तिची बांगडी फुटली मी पुन्हा संतापलेल्या सुरात काही तरी बोलायला लागलो ती एकदम म्हणाली गप एकदम गप्प बसायचं घरात माझं दारूड पोरग मला शिव्या देत दारूच्या नशेत मारतं सून सुद्धा घालून पाडून बोलते तुझ्यात मी माझा लेक बघितला डॉक्टर म्हणून मी नाही
तुझी वाट बघत लेक भेटणार म्हणून वाट बघते मला वाटलं तू तरी चांगला असशील पण नाही तू पण तसलाच निघाला आता नाही फोन करणार तुला कधी कधी सुद्धा करणार नाही तू बी तसलाच निघालास या तिच्या वाक्याने मी हरलो आता तिचा पुन्हा कधीही फोन आला तर तिचा रागवायचं नाही हे ठरवून मी तिथुन निघालो 13 सप्टेंबर पुन्हा सोमवार त्या दिवशी मला तिचा खरच फोन आला नाही 14 सप्टेंबर नेहमीप्रमाणे त्या जागेवर गेलो पण त्यादिवशी ती तिथे नव्हती
दुसऱ्या आजीला विचारलं इथली आजी कुठे आहे पदर लावत तीने आभाळाकडे बोट दाखवला आणि म्हणाली ती नऊ सप्टेंबरला गेली काय मी जोरात ओरडलो होय डॉक्टर आम्ही तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले जाताना तिने तुमचं नाव पण घेतलं अग मग फोन करायचा ना अशावेळी मी ओरडून रागाने तिला म्हणालो नाही डॉक्टर ती मला म्हटली डॉक्टरला लावायचा नाही कोणी माझी शपथ आहे तुम्हाला म्हणून आम्ही नाही लावला फोन माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले मला इथून पुढे फोन न करण्याचा शब्द तिने शब्दशहा पाळणा
सर्व लोक असूनही कोणीच नसणारी ही आजी माझ्यात तिचा लेक शोधत होती मलाच नातं पाळता आलं नाही ती तर गेली पण तू भी कसलाच निघालास या या वाक्याचा असं ओझ मनावर ठेवून गेली या वाक्याच्या ओझ्याखाली दबून जाऊन जगण हीच मला मिळालेली शिक्षा आज सोमवार दिनांक 20 सप्टेंबर आजचा सोमवार संपत आलेला आहे मी दिवसभर तिच्या फोनची वाट पाहतोय तो येणार नाही हे माहीत असूनही म्हातारे सोड की राग आता लाव की एक फोन मला नाही चिडणार तुझ्यावर अगं उद्या मंगळवार आता उद्या कोणाला भेटू मी म्हातारे सांग की सांग ना दिनांक 20 सप्टेंबर 2021 एक मावळलेला सोमवार
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद