सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील नंदिनी नक्की कोण आहे पहा

कलर्स वाहिनीवर वरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अभिमन्यू लतिका ला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आणि आपला तुटलेला संसार पुन्हा जोडण्यासाठी बापूंच्या घरी जातो तिथे गेल्यावर मात्र बापूंचा राग अनावर होतो आणि अभिमन्युला ते घरातून बाहेर काढतात

अभिमन्यू बापूंना समजवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो लतिका माहेरी आणि सासरी दोन्ही घरी सुखी राहील असे आश्वासनही देतो पण अभिमन्यूच्या वागणुकीमुळे बापू त्याच्यावर विश्वास ठेवण्यास असमर्थ ठरतात तर तिकडे अभिमन्यूचे वडील त्याची बाजू सावरण्याचा प्रयत्न करताना दिसतात

अभिमन्यू आपला मुलगा आहे आणि त्याला जे पाहिजे ते मिळवून देण्याची त्यांची इच्छा ते व्यक्त करतात मालिकेत घडणाऱ्या घडामोडीचा आता नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे हे पात्र म्हणजे नंदिनी हे पात्र नेमके कोण साकारणार आणि ही नंदिनी नक्की आहे तरी कोणी याबाबत उत्सुकता निर्माण होते

नंदिनीची भूमिका अभिनेत्री आदिती द्रविड साकारणार आहे आधी तिने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचे शनायाची मैत्रीण म्हणजे इशाची भूमिका साकारली होती त्यानंतर आदिती आणि रसिका सुनील या दोघींचीही चांगलीच मैत्री झाली होती

आदिती आणि रसिका यू अंड मी या व्हिडिओ अल्बम मध्ये झळकल्या होत्या त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आदिती अभिनेत्री सोबतच गीतकार देखील आहेत तिने लिहिलेले झिल्मिल हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा

या मालिकेत तिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे थोरली बहीण तुळसा ची भूमिका साकारली होती तिने साकारलेल्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते आदिती आता कलर्स मराठी वरच्या सुंदरा मनामध्ये भरली या लोकप्रिय मालिकेत इंट्री घेत आहे

तिची ही विरोधी भूमिका असणार की आणखी काही हे येत्या काही भागात स्पष्ट होईलच तर तुम्ही सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत नंदिनीचे हे पात्र साकारणारी अभिनेत्री आदिती द्रविडला पाहण्यास उत्सुक आहात का आदिती चा अभिनय तुम्हाला कसा वाटतो

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *