अभिनयाकडे पाठ फिरवत प्रिती झिंटा करतेय हे काम पाहणाऱ्यांना बसतोय धक्का

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा बर्‍याच काळापासून चित्रपटांमध्ये दिसलेली नाही. मात्र तरीही ती कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हेडलाईनमध्ये असते. प्रितीने आयपीएल टीम देखील सांभाळली आहे. ती सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. आता अभिनेत्रीने तिचा नवीन व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जो चर्चेत आहे.

अभिनेत्रीने सुरू केलं नवीन काम
या व्हिडिओच्या माध्यमातून प्रीती झिंटाने सांगितलं की तिने चित्रपटांपासून दूर राहून कसं नवीन काम सुरू केलं आहे. या व्हिडिओमध्ये प्रिती अतिशय सुंदर ठिकाणी दिसत आहे. तिच्या आजुबाजूला सुंदर हिरवळ दिसत आहे. याचा शोध घेतला असता असं दिसून येतंय की ही बाग दुसरं तिसरं शेत नसून सफरचंदाची बाग आहे ज्यांच्या फांद्या सफरचंद फळांनी भरलेल्या आहेत.

प्रीती झिंटा झाली शेतकरी
प्रीती झिंटा व्हिडिओमध्ये म्हणत आहे की आता मी अधिकृतपणे शेतकरी झाली आहे मी नेहमी इथे येईन. अभिनेत्रीने यापूर्वी अनेकवेळा फळे आणि भाज्यांसोबत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. हे स्पष्ट आहे की आजकाल अभिनेत्रीचे मन शेती आणि झाडांमधे रमलेलं दिसत आहे.

प्रीतीच्या कुटुंबाचं फार्महाऊस व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओबद्दल बोलताना प्रीतीने सांगितलं की ती शिमला येथील तिच्या कुटुंबाच्या फार्महाऊसवर आहे जिथे चारही बाजूंनी सफरचंदांनी भरलेली ही झाडे आहेत. प्रीती झिंटाने सांगितलं की शिमलामध्ये सध्या पाऊस पडत आहे आणि ती इथे तिच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत आहे. व्हिडिओमध्ये सफरचंदाची झाडे दाखवत अभिनेत्री हिमाचलची सफरचंद सर्वोत्तम असल्याचं सांगत आहे.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *