बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनचं नाव आता आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. फार कमी कालावधीत तिनं बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख तर तयार केलीच पण त्यासोबतच बरेच हीट चित्रपटही दिले आहेत. क्रितीनं आतापर्यंत वेगवेगळ्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत क्रितीला फ्लर्ट, डेटिंग आणि लग्न याविषयी प्रश्न विचारण्यात आले. ज्याची क्रिती सेनॉनने बिनधास्त उत्तरं दिली. अलिकडेच क्रिती सेनॉननं इंडिया टुडे ई- माइंड रॉक्स २०२१ मध्ये भाग घेतला होता.
अशात एका रॅपिड फायर राउंडमध्ये क्रितीला काही मजेदार प्रश्न विचारण्यात आले. यात एक प्रश्न असा होता. प्रभास, टाइगर श्रॉफ आणि कार्तिक आर्यन यांच्यापैका कोणासोबत फ्लर्ट, कोणाला डेट आणि कोणाशी लग्न करायला आवडेल? या प्रश्नांच्या सुरुवातीला तर क्रिती खूपच गोंधळलेली दिसली.
पण नंतर तिनं बिनधास्तपणे उत्तर दिलं. क्रिती म्हणाली, ‘मला कार्तिक आर्यनसोबत फ्लर्ट करायला आवडेल. टायगरला डेट करण्याची इच्छा आहे आणि लग्न प्रभासशी करायला आवडेल. दरम्यान क्रिती सेनॉन या दोन अभिनेत्यासोबत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
तर प्रभाससोबत आगामी काळात एका चित्रपटात दिसणार आहे. क्रितीनं टायगरसोबत ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. तर कार्तिक आर्यनसोबत ती लुकाछुपी मध्ये दिसली होती. याशिवाय येत्या काळात ती प्रभासच्या आदिपुरूष मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद