गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या देवमाणूस मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला, तरी मालिकेची चर्चा थांबायचं नाव घेत नाहीए. मालिकेचा शेवट महाएपीसोडनं करण्यात आला असला तरी मालिकेचा शेवट प्रेक्षकांना पटला नाहीए.
मालिकेचा शेवट हा अनुत्तरीत राहिला असल्यानं ‘देवमाणूस पार्ट २’ येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. मालिका निरोप घेणार असल्याचं वातावरण तयार करण्यात आलं होतं. कलाकारांचे भावुक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
पण अशाप्रकारे मालिका संपवल्यानं प्रेक्षकांचा हिरमोड झाला आहे. गुन्हेगारीला खतपाणी घालणारं हे सर्व असल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं आहे. तर सोशल मीडियावर मीम्स देखील व्हायरल झाले आहेत.
मालिका आणि कलाकारांना मिळालेल्या प्रेमामुळं मालिकेचा दुसरा भाग येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. कलाकारांनी देखील याला सोशल मीडियावरील व्हिडिओंद्वारे दुजोरा दिला आहे.
पण मालिकेचा दुसरा भाग आला तरी पाहाणार नाही अशा तीव्र प्रतिक्रियाही प्रेक्षकांकडून येत आहेत. प्रेक्षकांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार नाही असंही अनेकांनी म्हटलं आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद