प्रॅंकच्या नावाखाली आमिर खाननं केलं होतं असं काही की जुही चावला संतापली

हिंदी सिनेमासृष्टीमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला आमिर खान आणि अभिनेत्री जुही चावला यांची जोडी मोठ्या पडद्यावर कायमच हिट ठरली आहे. आमिर खानने कयामत से कयामत तक मधून अभिनयाच्या विश्वात पदार्पण केले त्याच सिनेमातून जुहीने देखील अभिनेत्री म्हणून पदार्पण केले.

त्यानंतर या दोघांनी अनेक सिनेमांत काम एकत्र केले. त्यांच्यात ऑफस्क्रिनही छान मैत्री झाली होती. परंतु इश्क सिनेमाच्या चित्रीकरणावेळी असे काही घडले की त्यामुळे या दोघांच्य मैत्रीमध्ये दुरावा आला. इतकेच नाहीतर अनेक वर्षे हे दोघे एकमेकांशी बोलतही नव्हते.

त्या घटनेनंतर आमिरने जुहीची माफीही मागितली होती. परंतु जुहीचा राग काही कमी झाला नाही. काय घडले होते या दोघांमध्ये नेमके अजय आमिर मिळून करायचे प्रँक इश्क सिनेमाच्या चित्रीकरणावेळी आमिर आणि अजय दोघे मिळून युनीटमधील प्रत्येक सदस्याची मस्करी करण्यासाठी प्रँक करायचे. एक दिवस त्यांनी दिलीप ताहिल यांच्या कपड्यांमध्ये खाजखुजलीची पावडर टाकली होती.

ते कपडे त्यांनी घातल्यावर डास चावल्यासारखे त्यांना वाटत होते. शेवटी त्यांना हे सगळे असह्य झाले. त्यांची ती अवस्था पाहून सेटवरी प्रत्येकजण हसू लागले तेव्हा अजय आणि आमिरने केलेली मस्करी सगळ्यांसमोर आली.

जेव्हा जुही रडू लागली आमिर खान आणि जुही चावला यांनी इश्कच्या आधी पाच सिनेमांत एकत्र काम केले होते. त्यांच्यातील मैत्री खूप छान होती. त्यामुळे जुहीसोबत प्रँक करण्याचा विचार आमिरच्या मनात आला. त्या दिवशी अंखिया तू मिला ले राजा या गाण्याचे चित्रीकरण सुरू होते.

त्यावेळी आमिर जुहीकडे गेला. आमिरने तिला सांगितले की हात पाहून तो भविष्य सांगू शकतो. म्हणून मग जुहीने तिचा हात आमिरच्या समोर ठेवला आणि त्याचवेळी आमिर तिच्या हातावर थुंकला आणि पळून गेला. आमिरच्या या कृतीने जुही चांगलीच संतापली आणि नाराज होऊन रडू लागली.

जुहीची मागितली माफी जुहीची अशी मस्करी केल्याने ती चांगलीच संतापली. त्यामुळे तिने दुस-या दिवशी ती चित्रीकरणाला आलीच नाही. हे प्रकरण गंभीर होत असल्याची जाणीव दिग्दर्शक इंदरकुमार यांना झाली. त्यानंतर आमिर आणि अजय देवगणला घेऊन ते जुहीच्या घरी गेले. त्यानंतर या दोघांनी जुही चावलाची माफी मागितली.

आमिरला आला राग जुही सिनेमाच्या चित्रीकरणाच्या सेटवर न आल्याने आमिरला खूपच राग आला होता. जुहीचे हे असे वागणे बालिशपणाचे असल्याचे मत त्याने व्यक्त केले होते. तिच्या न येण्याने निर्मात्याचे एका दिवसाचे नुकसान झाले. त्यानंतर आमिर आणि जुही एकमेकांपासून दूर रहायचे. इतकेच नाही तर त्यांच्यातील बोलणे ही बंद झाले होते.

सात वर्षांनंतर दोघे बोलले आमिर आणि रीना दत्ता यांनी घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. ही बातमी जेव्हा जुहीला समजली तेव्हा तिने या दोघांना फोन करून असे न करण्याची विनंती केली होती. तेव्हा जुहीच्या मनात आपल्याबद्दल काळजी आणि जिव्हाळा कायम असल्याची जाणीव आमिरला झाली.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *