ती परत आलीये मधील या अभिनेत्याची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्री पल्लवी जोशीसोबत आहे हे नाते

झी मराठी वाहिनीवर नुकतीच ती परत आलीये ही मालिका दाखल झाली आहे. या मालिकेत अभिनेते विजय कदम मुख्य भूमिकेत पहायला मिळत आहेत. त्यांनी बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. त्यांचे काम प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. फार कमी लोकांना माहित आहे की विजय कदम यांची पत्नीदेखील अभिनेत्री आहे.

अभिनेते विजय कदम हे उत्तम अभिनेते असून त्यांनी अनेक चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. टोपी घाला रे बच्चे सबसे अच्छे, देखणी बायको नाम्याची, तोचि एक समर्थ मधुचंद्राची रात्र, अशा अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे.

विजय कदम यांनी ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या चित्रपटात अभिनेत्री अश्विनी भावेच्या नवऱ्याची भूमिका केली होती. टूर टूर, सही दे सही, पप्पा सांगा कुणाचे ही त्यांची नाटके खूप गाजली.

अभिनेते विजय कदम यांनी लव्ह मॅरीज केले असून त्यांची पत्नी देखील मराठी अभिनेत्री आहेत. विजय कदम यांच्या पत्नी पद्मश्री जोशी यादेखील अभिनेत्री आहेत. विजय कदम आणि पद्मश्री जोशी यांनी एकत्र नाटकात कामे केली आहेत.

विजय कदम यांनी दोनदा प्रपोज करूनही त्यांनी लग्नाला नकार दिला होता मात्र विच्छा माझी पुरी करा या नाटकातील विजय कदम यांनी निभावलेल्या भूमिकेमुळे त्या त्यांच्या प्रेमात पडल्या आणि आपला होकार कळवला. नणंद भावजय, पोरीची धमाल बापाची कमाल, नवलकथा या चित्रपटात पद्मश्री जोशी यांनी काम केले आहे.

पद्मश्री जोशी सध्या सिनेइंडस्ट्रीतून गायब आहेत. काही दिवसांपूर्वी चला हवा येऊ द्याच्या सेटवर दोघांनी जोडीने हजेरी लावली होती. तसेच फार कमी लोकांना माहित असेल की विजय कदम यांच्या पत्नी पद्मश्री जोशी आणि पल्लवी जोशी या सख्ख्या बहिणी आहेत.

संगीत प्रशिक्षिका सुषमा जोशी या अभिनेत्री पद्मश्री जोशी यांच्या आई. सुषमा जोशी यांना दोन मुली पद्मश्री, पल्लवी आणि एक मुलगा मास्टर अलंकार. मास्टर अलंकार हा देखील एक उत्तम अभिनेता आहे पण आता तो अभिनयापासून दूर जाऊन स्वतःचा बिझनेस सांभाळतो आहे.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *