जाणून घ्या अभिनेत्री अमृता पवार बद्दल

संध्या जी मराठी वर आपण नव नवीन मालिका येत असताना पाहत आहोत यामध्ये झी मराठी वाहिनीवर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही मालिका सुद्धा 30 ऑगस्ट पासून आपल्याला पाहायला मिळणार आहे ही मालिका शनिवार ते सोमवार ह्या दरम्यान रात्री नऊ वाजता आपल्याला झी मराठी वाहिनीवर दिसणार आहे

या मालिकेमध्ये आपल्याला अभिनेत्री अमृता पवार या प्रमुख भूमिकेमध्ये दिसून येणार आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत अमृता पवार यांचे भूमिकांविषयी काही खास गोष्टी अमृता पवार यांची लक्षवेदी ठरलेली भूमिका म्हणजे सोनी मराठीवरील स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेतील जिजामाता यांची भूमिका छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रवासात जिजामाता यांचा खूप मोठा आणि मोलाचा वाटा होता

स्वराज्य निर्मिती मध्ये त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या त्यांचे संसकार यामुळेच एक जाणता राजा आपल्या देशाला लाभला स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेमध्ये अमृता पवार यांनी जिजामाता यांची भूमिका उत्तम पद्धतीने साकारली आणि त्यानंतर त्या सोनी मराठी वरील जिगरबाज ह्या मालिकेमध्ये डॉक्टर आदिती यांचे भूमिका मध्ये आपल्याला दिसल्या

चला तर मग जाणून घेऊया आणखीन कोणत्या भूमिका त्यानी याआधी साकार केले आहेत अमृता पवार यांचा जन्म 15 डिसेंबरला मुंबईत झाला पार्ले टिळक विद्यालयातुन त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आर ए पोद्दार कॉलेजमधून त्यांनी आपले महाविद्यालयांची शिक्षण पूर्ण केले

अमृता यांनी स्टार प्रवाह वरील दुहेरी या मालिकेतुन छोट्या परड्यावर पदार्पण केलं दोन बहिणींच्या आयुष्यावर ही बेतलेली मालिका होती आणि या मालिकेमध्ये त्यांनी नेहाची भूमिका साकार केली होती ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली या मालिकेला जितका कौतुक मिळाला तितकच कौतुक या भूमिकेला सुद्धा मिळालं

या दुहेरी मालिकेनंतर त्या पुन्हा एकदा आपल्याला स्टार प्रवाह वरील ललित 205 या मालिकेमध्ये दिसून आल्या ललित 205 मध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केली होती या मालिकेत त्यांचं नाव होतं भैरवी आणि हे भैरवी पात्र साकारताना त्यांनी आपली संपूर्ण कसव वापरली

या सर्व भूमिका नंतर आणि खूप साऱ्या अनुभवानंतर पुन्हा एकदा त्या छोट्या परड्यावर येण्यासाठी सज्ज झाले आहेत तर अमृता पवार यांना त्यांचे या पुढच्या मालिका साठी त्यांचे सगळ्या चाहत्यांकडून खूप साऱ्या शुभेच्छा

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *