अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर तालिबानने कब्जा मिळवण्याचा काही तासांपूर्वी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी आणि उपराष्ट्राध्यक्ष अमिरुल्लाह सालेह यांनी १५ ऑगस्ट रोजी देश सोडला तालिबानने गेल्या दहा दिवसात अफगाणिस्तानातील बहुतांश मोठ्या शहरांवर ताबा मिळवल्याने राष्ट्राध्यक्ष घनी यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत होता अशात जेव्हा
तालिबानने काबूलस्थित राष्ट्राध्यक्ष भवनाकडे कूच केली तेव्हा राष्ट्राध्यक्ष घनी यांनी देश सोडल्याचा बातम्या येऊ लागल्या अखेर त्यांनी एक फेसबुक पोस्टद्वारे त्यांची भूमिका मांडली की त्यांनी देश का सोडला ते म्हणाले आज मला एक कठीण निर्णय घ्यायला लागणार होता एकतर राष्ट्रपती भवनात प्रवेश करू इच्छिणाऱ्या सशस्त्र तालिबान्यांच्या समोर उभं राहावं किंवा ज्या
देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आयुष्याची वीस वर्षे दिली त्या देशाला सोडावं यात असंख्य लोकांचा जीव गेला असता काबूल शहराला उ-ध्व-स्त होताना पाहावं लागलं असतं तालिबानने ठरवलंय की मला इथून बाहेर काढायचे त्यामुळे आणखी रक्तपात होऊ नये म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला मी काबूल मध्ये थांबलो असतो तर
संघर्ष झाला असता आणि त्यापुढे लाखो लोकांच्या जीवाला धो-का निर्माण झाला असता तालिबानने आता तलवार आणि बंदुकीच्या जोरावर विजय मिळवला आहे आता देशातील लोकांच्या जीवाची जबाबदारी तालिबानवर आहे मात्र ते लोकांची मने जिंकू शकणार नाहीत इतिहासात कुणालाही बळजबरीने हा हक्क
मिळवता आला नाही आणि आताही मिळणार नाही त्यांना आता एक ऐतिहासिक परीक्षेला तोंड द्यावे लागेल आता ते एकतर अफगाणिस्तानच नाव आणि स्वाभिमान वाचावतील किंवा इतर भागांवर संबंधावर लक्ष केंद्रित करतील त्यांना लोकांना विश्वासात घेणं खूप आवश्यक आहे पुढे तुम्ही नेमकं काय करू इच्छिता याचा एक स्पष्ट आराखडा बनवा आणि तो अफगाणिस्तानच्या
नागरिकांना सांगा मी नेहमीच अफगाणिस्तानच्या भविष्यासाठी बौद्धिक पातळीवर काम करेन पुढे आपल्याला बराच विकास घडवायचा आहे बरच काही करायचं आहे अफगाणिस्तान जिंदाबाद असे अशरफ घनी त्यांच्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हणाले तालिबानने मात्र काबूलमध्ये होणारी संभाव्य लुटमार रोखण्यासाठी आपण शहरात प्रवेश करत आहोत असे म्हटले आहे तालिबानचे
प्रवक्ते सुभेन शाहीत यांनी म्हटलं आहे की अफगाणिस्तानात तालिबानला कुणावरही सुद उगवायचा नाहीये देशातील नागरिकांचा जीव आणि मालमत्ता सुरक्षित आहे याची मी सर्वांना खात्री देतो आम्ही अफगाणिस्तानच्या जनतेचे सेवक आहोत
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.