मराठी इंडस्ट्रीज मध्ये पिता पुत्रांच्या अनेक जोड्या आपल्याला पाहायला मिळतात आज आपण मराठी चित्रपट सृष्टीतील अशाच प्रसिद्ध पिता पूत्रांच्या जोड्या बघणार आहोत तुला पाहते रे आणि रंग माझा वेगळा या प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे आशुतोष गोखले आशुतोष गोखले हा मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते विजय गोखले यांचा पुत्र आहे विजय गोखले यांनी सालीने केला घोटाळा ही पोरगी कोणाची पोलिसाची बायको अशा चित्रपटात
काम केले आहे मराठी इंडस्ट्रीज मधील हँडसम हिरो म्हणजे अजिंक्य देव आणि त्यांचे वडील रमेश देव या दोघांनी देखील मराठी इंडस्ट्रीज मध्ये आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे सध्या अजिंक्य देव आपल्याला स्टार प्रवाह वरील जय भवानी जय शिवाजी या मालिकेत दिसून येत आहेत स्टार प्लसवरील इमली या मालिकेत सध्या प्रेक्षकांचं मन जिंकत आहे असा अभिनेता दश्मिर महाजनी यांचे वडील सुप्रसिद्ध अभिनेते रविंद्र महाजनी आहेत आजवर अनेक मराठी चित्रपटात
विविध भूमिका साकारून त्यांनी मराठी मनावर राज्य केलं त्याचं बरोबर पुढची जोडी आहे सध्या झी मराठीवर चालू असलेली मालिका माझा होशील ना या मालिकेमधील बंडू मामा म्हणजेच अभिनेते सुनील तावडे यांचा शुभंकर तावडे देखील आपल्याला अभिनय क्षेत्रात दिसून येत आहे झी युवा वरील फ्रेशर्स या मालिकेमध्ये आणि त्याचबरोबर कागर या चित्रपटांमध्ये देखील तो दिसून आला होता मराठी इंडस्ट्रीज मध्ये आणखी एक फेमस जोडी आहे ती म्हणजे कोठारे पिता
पूत्रांची आदिनाथ कोठारे हा देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत चित्रपट सृष्टीच्या या जगामध्ये आला त्याचे वडील महेश कोठारे यांनी अनेक चित्रपट यांनी अगदी सिल्वर जुबली दिले सध्या आदिनाथ कोठारे सिटी ऑफ ड्रीम या वेब सिरिजच्या माध्यमातून सगळ्यांना भेटीस येत आहे आणि त्याची चर्चा सुध्दा उत्तम आहे आज लक्ष्मीकांत बेर्डे हे जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे हा अभिनयाची जादू प्रेक्षकांवर बिघेरत आहे ती सध्या काय करते या
त्याच्या पहिल्या चित्रपटापासूनच त्याची खूप क्रेझ होती आणि त्यांनतर सुध्दा अनेक चित्रपटामध्ये तो दिसून आला पण त्या कामांना प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही भविष्यकाळात तो आणखी चांगले चित्रपट घेऊन येईल अशीच अपेक्षा करू अभिनेते दिग्गदर्शक निर्माते महेश मांजरेकर काकस्पर्श मी शिवाजीराजे भोसले बोलतोय यांसारखे सुप्रसिध्द चित्रपट यांची निर्मिती केली त्यांचा मुलगा सत्या मांजरेकर हा देखील आता अभिनय
क्षेत्रात पदार्पण करत आहे त्याचबरोबर FU या चित्रपटात देखील दिसून आला होता तर हे होते चित्रपट आणि मालिकांमध्ये दिसणारे पिता पुत्र जे अभिनयाची जादू आपल्यावर करत आहेत
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.