झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत सध्या ओम आणि स्विटूच्या लग्नाची तयारी सुरू आहे या मालिकेत चिन्याचे पात्र साकारणारा अर्णव राजे याची ही पहिलीच मालिका आहे पण या मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली चिन्या म्हणजेच अभिनेता अर्णव राजे याचे खरे वडील सुध्दा अभिनेता आहेत त्यांचं नाव आहे जयेश राजे
जयेश राजे यांनी अनेक लघुपटांमध्ये अभिनय केला आहे तसेच रेश्टिन पिस या सिरीज मध्येही त्यांनी काम केलं आहे २०१९ मध्ये अपर्णा स्टेट फेस्टिवलच्या सादरीकरणात जयेश राजे यांनी लघुपटातून मार्गदर्शन केले होते यामुळेच वडील अभिनेता असल्याने चिन्याला म्हणजेच अर्णवला लहानपणापासुनच अभिनयाचे मार्गदर्शन मिळत गेले त्यामुळेच अर्णव हा त्याच्या वडिलांना त्याचे
पहिले गुरू मानतो अर्णवला शाळेत असल्यापासून अभिनयाची आवड निर्माण झाली होती त्यामुळे तो अनेक नाट्य अभिनय कार्यशाळेत सहभाग घेत असे पुढे कॉलेजमध्ये असताना त्याला अनेक नाटकांमध्ये विविध भूमिका साकारायला मिळाल्या या दरम्यान त्याने नाट्य स्पर्धा गाजवल्या पुढे भाग तनो भाग ही एकांकिका सादर करत असताना सुवर्ण राणे
यांना अर्णवचा अभिनय खूप आवडला सुवर्ण राणे या येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या क्रियेटीव्ह प्रोडयुसर म्हणून कार्यरत आहेत त्यांना अर्णवचा अभिनय आवडल्याने त्यांनी येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील चिन्याच्या भूमिकेसाठी निवड केली आणि अशाप्रकारे चिन्या म्हणजेच अभिनेता अर्णवला त्याची पहिली मालिका मिळाली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.