अनेक कलाकारांची मुले ही त्यांच्या आईवडिलां प्रमाणे त्याच कलाक्षेत्रात उतरल्याचे आपण अनेकदा ऐकल आहे पण काही कलाकारांच्या मुलांनी वेगळ्या क्षेत्रात उतरून त्यांची एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली याचीही खूप चर्चा होत असते आणि अगदी त्याच पद्धतीने सध्या मराठी मधील प्रसिद्ध अभिनेते नागेश भोसले यांच्या मुलीची सुद्धा खूप चर्चा होत आहे
अभिनेते नागेश भोसले यांनी अनेक हिंदी मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले पण त्यांच्या मुलीने मात्र वडीलांप्रमाने अभिनय क्षेत्रात न येता एका वेगळ्या क्षेत्राची निवड केली अभिनेते नागेश भोसले यांच्या मुलीचे नाव कुहू भोसले असे आहे कुहु ही बॉडी बिल्डर बनली वयाच्या सतराव्या वर्षी हिने या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आता तिने बॉडी बिल्डर क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली
वयाच्या सतराव्या वर्षी कुहूने जिम जॉईन केली होती एक वर्ष जिम केल्यानंतर त्यांच्या ट्रेनरने तिला एका बॉडी बिल्डरची स्पर्धा पाहण्यासाठी पाठवले ही स्पर्धा कुहुला खूप आवडली पण परदेशामध्ये ज्याप्रमाणे महिला सिद्ध या स्पर्धांमध्ये भाग घेतात तसे भारतात अशा बॉडी बिल्डरच्या स्पर्धांमध्ये महिला फार कमी प्रमाणात भाग घेतात पण कुहुने मात्र या क्षेत्रात एन्ट्री करायचे
ठरवले यानंतर तिने प्रचंड मेहनत घेत फिटनेस ट्रेनिंग आणि डाएट फॉलो करत ती आता देशातील टॉप बिकनी ॲथलेट पैकी एक बनली आहे सध्या कोवी फिटनेस कोच आणि बिकनी ॲथलेट आहेत ते बिकनी ॲथलेट स्पर्धांमध्ये भाग घेत असते जागतिक स्तरावर सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या एमॅचर ओलंपिया मध्ये ब्राँज मेडल सुध्दा जिंकले आहे खरतर भारतामध्ये आईवडील आपल्या मुलीला बिकनी ॲथलेट किंवा बॉडी बिल्डर या क्षेत्रात पाठवण्यास तयार होत नाहीत
पण कुहुचे वडील अभिनेते नागेश भोसले यांनी कुहूला तिच्या आवडते क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य दिले तिला नेहमी साथ दिली त्यामुळेच अभिनेता नागेश भोसले यांच्या या विचारांचं खूप कौतुक होत आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.