झी मराठीवरील २३ ऑगस्ट पासून अग्गबाई सूनबाई मालिकेच्या जागेवर माझी तुझी रेशीमगाठ ही नवीन मालिका सुरू होत आहे यात अभिनेता श्रेयस तळपदे अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि बालकलाकार मायरा वायकुळ हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत या मालिकेचे सुरुवातीचे प्रोमो बघून प्रेक्षकांना सुद्धा ही मालिका बघण्याची खूप उत्सुकता निर्माण झाली
आहे तर माझी तुझी रेशीमगाठी ही मालिका सुरू होण्याअगोदरच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ती म्हणजे अभिनेता श्रेयस तळपदेवर थेट चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे मग याचा मालिकेवर काय परिणाम होणार? असा प्रश्नही सर्वांना पडला आहे तर काय आहे हे प्रकरण? अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात शूटिंगचा सेट चोरी केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला
आहे यात निर्माते राहुल भंडारी यांनी त्यांच्या अलबत्या गलबत्या या नाटकाचा सेट चोरीला गेल्याची तक्रार ते शेवडी पोलीस ठाण्यात दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार नाटकाचा सेट प्रवीण भोसले यांच्या काळाचौकी येथील गोदामात ठेवण्यात आला होता मात्र तो सेट कोणतीही पूर्वकल्पना न देता अभिनेता श्रेयस तळपदे आणि सुरेश सावंत यांनी गोदाम मालकास खोटे सांगून
गोदामातून चोरून भक्षक या एकांकीच्या शूटिंगसाठी वापरला अशाप्रकारचा आरोप निर्माते राहुल भंडारी यांनी केलाय तसेच त्यांनी पोलीसात ही तक्रार दाखल केली तर अभिनेता श्रेयस तळपदे यांनी चिफ पब्लिसिटीसाठी असे आरोप करण्यात येत असल्याचे म्हटले आहे तसेच तो निर्माते राहुल भंडारी यांच्या विरोधात
कायदेशीर प्रक्रियेद्वारे मानहानीचा दावा करण्याचा विचार करत आहेत तर असा हा वाद सुरू आहे पण या प्रकरणामुळे मालिका सुरू होण्याअगोदरच अभिनेता श्रेयस तळपदे हा वादात सापडल्याचा दिसतो
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.