आज आपण एका सुजवळ साध्या आणि गोड स्वभावाच्या अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत त्याची सुंदर लव्ह स्टोरी चला तर मग सुरुवात करूया तो अभिनेता आहे श्रेयस तळपदे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीवर त्याने आपल्या अभिनयाच्या जादूने अधिराज्य गाजवले त्याची ही लव्हस्टोरी प्रेमाच्या कहानीमध्ये पहिली भेट खूप महत्त्वाची असते त्या पहिल्या भेटीतच आपल्याला प्रेम होतं आणि समोरचा माणूस आपल्याला आवडतो हे थोडेसे कळू लागतं म्हणूनच श्रेयस आणि दीप्ती यांची
पहिली भेट कशी झाली इथून सुरुवात करूया या दोघांची पहिली भेट झाली खरतर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रेयस यांना त्यांच्या मित्राचा फोन आला आणि तो म्हणाला केळकर कॉलेजमध्ये मुलुंडला एक गॅदरिंग फंक्शन अरेंज केले आहे आणि त्या कार्यक्रमात तुला सेलिब्रिटी म्हणून यायचे आहे मुलुंड हे लांब असल्यामुळे श्रेयस यांनी पहिल्यांदा नकार दिला मग श्रेयसच्या मित्राने त्याला असे सांगितले की माझी मैत्रीण आहे ती तुला इनविटेशन देण्यासाठी कॉल करेल त्यांनतर तिचा कॉल आला सुध्दा
पण श्रेयस यांनी असे सांगितले की तू माझ्या सेटवर येऊन मला इन्विटेशन दे आणि सेट खूप लांब होता तरी सुध्दा दीप्ती या कसतरी मॅनेज करून सेटवर पोहोचल्या त्यांना पोहोचण्यासाठी खूप उशीर झाला म्हणून श्रेयस यांना असे वाटले की बिचाऱ्या मुलीला म्हणजेच दिप्तीला आपण उगीचच सेटवर बोलावलं बिचारीला उगीचच त्रास दिला त्यांची ही खरतर पहिली भेट होती आणि संभाषण कौशल्य आणि त्यांचं वागणं बोलणं यावरूनच श्रेयस यांना पहिल्या भेटीतच दीप्ती या आवडून गेल्या आणि
इन्विटेशन देऊन दीप्ती या सेटवरून निघून गेल्या त्यांनतर पुन्हा कॉल आला आणि कार्यक्रमाचा दिवस जवळ येत होता सेलिब्रिटी म्हणून तुम्हाला बोलावलं आहे तुम्ही तेथे कसे येणार असा प्रश्न दीप्ती यांनी विचारला खरतर श्रेयस यांच्या करिअरच्या सुरुवातीचा हा काळ होता त्यांच्याकडे साधी गाडी सुध्दा नव्हती म्हणून त्यांनी मी बसने येणार असे उत्तर दिले मग दीप्ती म्हणाल्या की तुम्ही एक सेलिब्रिटी म्हणून येणार आहात आणि बसने येणार मग श्रेयस यांनी थोडेसे बजेट वाढवले श्रेयस म्हणाले पर्सनल रिक्षा करून येतो
मग दीप्ती यांना कळून चुकल आणि दीप्ती म्हणाल्या काही गरज नाही आम्ही कॉलेजची गाडी पाठवतो आणि त्या गाडीतून तुम्ही या खरतर हा प्रसंग सांगतो की सुरुवातीच्या काळात श्रेयस यांनी किती स्ट्रगल केला आहे या सर्व गोष्टींमुळे आणि या प्रसंगामुळे श्रेयस यांच्यावर दीप्ती यांचं एक चांगलं इम्प्रेशन पडलं त्यांची मैत्री झाली चार पाच दिवसच झाले होते ते एकमेकांना भेटले होते आणि त्याचवेळी श्रेयस यांनी पटकन दीप्तीला प्रपोज करून टाकलं तू मला खूप आवडतीस माझ्याबरोबर लग्न करशील का
असा प्रश्न दिप्तीच्या समोर ठेवला दीप्ती एकदम गोंधळून गेली हे ऐकताच तिला धक्काच बसला एखादा सेलिब्रिटी एकदमच अचानक अशी आपल्याला मागणी घालतो म्हटल्यावर कुठल्याही मुलीला धक्का बसेलच त्याचप्रमाणे दिप्तीलाही दीप्ती थोडीशी बावरली आणि म्हणाली मला थोडासा वेळ पाहिजे मी एकदम असे पटकन उत्तर देऊ शकत नाही आणि दिप्तीने वेळ घेतला तो तब्बल तीन वर्षांचा प्रपोज केल्यानंतर दोन तीन दिवसांमध्ये श्रेयसला भेटायला एका नाट्यगृहाबाहेर दीप्ती गेल्या पण श्रेयस यांनी दीप्तीला ओळखलचं नाही
ज्या मुलीला श्रेयस यांनी लग्नाची मागणी घातली होती त्या मुलीला ओळखू शकले नाहीत पण दीप्तीने श्रेयस यांना हात केला आणि लगेचच श्रेयस यांनी ओळखलं दीप्ती आणि श्रेयस यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली श्रेयस यांना होकार देण्यासाठी दीप्ती यांनी तब्बल तीन वर्षांचा कालावधी घेतला याचं काळामध्ये दोघांची करिअर उत्तम पद्धतीने चालू होती पण श्रेयस यांची सुरवातीच्या काळात पैशांची खूप चणचण होती श्रेयस यांनी अनेकवेळा दीप्ती यांच्याकडून टू व्हीलर मध्ये पेट्रोल भरण्यासाठी पैसे सुध्दा मागितलेले आहेत आणि ते दीप्तीनेही
बिनधास्त दिले आहेत दीप्ती यांनी श्रेयस यांना कित्येक प्रसंगांमध्ये साथ दिली आहे या सर्व चढ उतारानंतर दीप्ती यांनी श्रेयस यांना होकार दिला दोघांच्या घरी हे प्रकरण कळलं आणि दोघांच्या घरून परवानगी मिळाली आणि लग्नाचे सनई चौघडे वाजायला सुरुवात झाली ती तारीख होती ३१ डिसेंबर २००५ हे दोघेही विवाह बंधनात अडकले आणि त्यांचं हे खरे प्रेम यशस्वी झालं या दोघांनी मिळून एक प्रोडक्शन हाऊस सुध्दा चालू केलं सनई चौघडे या चित्रपटापासून त्यांच्या प्रोडक्शन हाऊस चा शी गणेशा झाला
दोघांना एक सुंदरशी मुलगी आहे आतापर्यंत श्रेयस तळपदे यांनी ओम शांती ओम गोलमाल रिटर्न हाऊसफुल २ पोस्टर बॉईज यासारख्या अनेक चित्रपटात काम केली आहेत खरतर श्रेयस तळपदे यांना एका चित्रपटाने ओळख निर्माण करून दिली असा अवॉर्ड विनिंग चित्रपट होता इकबाल आणि या चित्रपटापासूनच श्रेयस यांना खरी प्रसिध्दी मिळाली श्रेयस आणि दीप्ती यांचा सुखाचा संसार आजही त्याच जोमाने चालू आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.