धक्कादायक ही अभिनेत्री राहायची गोठ्यात

स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले हीचे रियल लाईफ स्टोरी एका चित्रपटाची कथानक वाटावी अशीच आहे रुपाली भोसले हिचे कुटुंब कोणकोणत्या संकटातून पुढे आले याची कहाणी तिने स्वप्नील जोशीच्या शेअर विथ स्वप्नील या रेडिओ शो मध्ये सांगितले आहे रुपाली भोसले आज यशाच्या शिखरावर जरी असली तरी इतपर्यंत येण्यासाठी तिने अपार मेहनत घेतली होती

याची सुरुवात झाली तिच्या कुटुंबाच्या असलेल्या एका वादामुळे रुपाली मुंबईच्या बिडिडी चाळीत लहानाची मोठी झाली नववीत शिकत असताना तिच्या काकांनी वडिलांना एक स्कीम सुचवली या स्कीम मधून रुपालीच्या वडिलांनी जवळपास होते नव्हते तेवढे पैसे काकांकडे सुफुर्त केले होते या स्कीममुळे रुपालीच्या वडिलांची फसवणूक झाली आणि तिच्या काकांना अटक करण्यात आली मात्र यामुळे रुपालीचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले होते

अक्षरशः खाण्यासाठी देखील त्यांच्या हातात पुरेसे पैसे नव्हते नववीत शिकत असलेल्या रुपालीला आर्थिक चणचनिमुळे शिक्षण सोडावे लागले अशातच रुपालीच्या काकीने राहते घर विकून त्यांच्याकडे येण्याचा सल्ला दिला मात्र यात काकिने देखील त्यांच्या कुटुंबाला पूर्णपणे लुबाडले घराचे आलेले सर्व पैसे काकीने लुबाडले आणि रुपालीच्या कुटुंबाला घरातून हाकलून लावले भर पावसात रूपालीचे कुटुंब आसरा

शोधत होते रुपाली आणि तिचा लहान भाऊ पावसाने भिजू नये म्हणून आईने त्यांच्या डोक्यावर ताडपत्री धरली होती अशा कठीण प्रसंगाला तोंड देत असताना रुपालीच्या आईला दोनवेळा रुदयचा झटका येऊन गेला हे कुटुंब रस्त्यावर दिवस काढतेय हे पाहून रुपालीच्या वडिलांचे एक मित्र त्यांच्या मदतीसाठी धावून आले होते परंतु त्या मित्राच्या समोर एक मोठा प्रश्नचिन्ह होता की आपले स्वतःचेच कुटुंब इतके मोठे आहे

या कुटुंबाला आपण कुठे आसरा देणार घरात एवढ्या मोठ्या माणसांचं राबता असताना मित्राने रुपालीच्या कुटुंबाला आपल्याच घरात एक दिवस राहण्याची सोय करून दिली दुसऱ्या दिवशी लगेचच एक छोटी पत्र्याची खोली त्यांना पाहून दिली त्या पत्र्याच्या खोलीत अगोदर गुरे बांधली जायची परंतु दुसरा पर्याय नसल्याने आणि हातात पैसे नसल्याने त्या गोठ्यात त्यांना राहावे लागले गोठ्यात तात्पुरती राहण्याची सोय झाली असली तरी

त्यांच्या भिंतींना अनेक तडे गेले होते त्याला मोठमोठी छिद्रे देखील पडली होती बाहेरील बाजूने आतमध्ये सहज डोकावता येऊ शकत असल्याने रुपाली पहाटे ३ वाजता उठून अंघोळ उरकून घ्यायची रुपालीचा भाऊ लहान होता मात्र आपल्या कुटुंबाची होणारी वाताहात कळत होती यातूनच त्यांच्या मनात एकदा आत्महत्या करण्याचा विचार आला हे पाहून रुपालीने नोकरी करण्याचा निर्णय घेतला अपार मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने आपल्या कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला

केवळ नववी शिक्षण झालेल्या रुपालीने पुढे जाऊन हिंदी मालिकांमध्ये स्थान मिळवलं मालिका चित्रपट असा तिचा प्रवास खरोखर उल्लेखनीयचं म्हणावा लागेल कुटुंबाला सावरून आपलं अस्तित्व निर्माण करणाऱ्या रूपालीने अभिनय क्षेत्रात आता आपला पाय घट्ट रोवला आहे आई कुठे काय करते या मालिकेत ती विरोधी भूमिका साकारत आहे या भूमिकेने रूपालीला प्रसिध्दी तर मिळवून दिलीय याशिवाय भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या रोषालाही तिला सामोरे जावे लागत आहे तिचं तिच्या समग अभिनयाची पावती ठरली आहे

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *