सेटवर झाला भयानक प्रसंग हा कलाकार थोडक्यात बचावला

जयंती या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू होते या चित्रपटात अभिनेते मिलिंद शिंदे महत्वाच्या भूमिकेत आहेत या चित्रपटाच्या चित्रीकरादरम्यान त्यांच्यासोबत अगदी जीवावर बेतन्या इतकी घटना घडली यावेळी मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले असून मोठा अपघात टळलाआहे अभिनेता मिलिंद शिंदे हे त्यांच्या भूमिकेचा सराव करण्यात मग्न होते

तर दुसरीकडे सेटवर जिमिजीप कॅमेराचा सेटअप लावलेला होता कॅमेरा टीमही जीमिजीप वर पुढील मंद प्रकाशातील शॉटच्या चित्रीकरणाचे सराव करत होती यावेळी एका सिनसाठी जिमिजिप क्रेनच खाली येणं हा चित्रीकरणाचा एक महत्त्वाचा भाग होता आणि म्हणूनच क्रेनच्या वेगाने नियंत्रण हे चोख असावे यासाठी टीम काम करत होती या आव्हानात्मक शॉटच्या सरावावर टीम इतकी गुंतली होती की कोणालाच आपल्या सरावात मग्न असलेले

मिलिंद शिंदे हे क्रेनच्या दिशेने उभे होते समजले नाही जीमिजिप क्रेनने नियंत्रित करणाऱ्या ऑपरेटरला खाली उभे असलेले मिलिंद शिंदे दिसले आणि सरावा दरम्यान वेगाने खाली येणाऱ्या जिमीजीप क्रेनला अगदी चपळाईने नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत दुसऱ्या बाजूला वळवली नेमक्या त्याच क्षणी मिलिंद शिंदे काही सेकंदातच खाली वाकले आणि थोडक्यात बचावले जिमिजिप ऑपरेटर ने प्रसंगावधान

दाखवून ती क्रेन नियंत्रित केली म्हणून होणारा अपघात टळला सेटवर घडलेल्या या घटनेत सुदैवाने मिलिंद शिंदे यांना दुखापत झाली नाही या घडलेल्या प्रसंगाबद्दल अभिनेते मिलिंद शिंदे सांगतात एखादे चांगले काम आपल्या हातून घडत असेल तर तेव्हा संकटाची सावली देखील आपल्यावर पडत नाही अगदी त्याचप्रमाणे मी जरी माझ्या भूमिकेच्या तयारीत रमून गेलो होतो रात्रीच्या समयी माझ्या आजूबाजूला चालत असलेल्या

गोष्टी देखील मला त्या क्षणी दिसल्या नाहीत मग ती मोठी जिमिजिपी का असेना मी त्यावेळी जर झुकलो नसतो तर लोखंडी जिमिजिपच्या माराने कदाचित मला गंभीर दुखापत झाली असती पण सेटवरच्या सकारात्मक ऊर्जेमुळे मला खरचटले देखील नाही सेटवर लोकांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे माझा जीव वाचला मी जरी माझ्या कामात रमलो असलो

तरी सेटवरील प्रत्येकाने मला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत काम केलं याचं मला कौतुक वाटतं मिलोओरीओ फिल्म्स निर्मित तसेच शैलेश नरवडे दिर्गदर्शित जयंती हा एक क्रियेशन ड्रामा चित्रपट आहे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपट गृहात येण्यासाठी सज्ज होत आहे

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *