मराठी चॅनेलच्या टीआरपीच्या आकडेवारीत स्टार प्रवाह वाहिनीने झी मराठी वाहिनीला बरेच मागे टाकले आहे. झी मराठीच्या सध्या चालू असलेल्या मालिकांचा घसरलेला दर्जा यामुळे प्रेक्षकांकडून नापसंती दाखविण्यात आली. त्याच कारणाने आता झी मराठी वाहिनीला सर्वच्या सर्व मालिका बंद कराव्या लागत आहेत.
यामुळे एक मोठा बदल घडून या वाहिनीला फायदा होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीने तब्बल 5 नवीन मालिकांचे प्रोमो प्रदर्शित करण्यात आले आहेत. आज दिनांक 3 ऑगस्ट रोजी झी मराठीने 5व्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला असून त्यामध्ये अभिनेता व अभिनेत्रीचा चेहरा लपवण्यात आला आहे.
प्रोमो वरून तर मालिका उत्तम वाटत आहे. या मालिकेत नक्की कोणते कलाकार असणार हे जाणून घेऊयात. प्रोमो मध्ये दिसणारी अभिनेत्री ही मराठी मालिकांतील लोकप्रिय चेहरा ऋता दूर्गुळे ही आहे. युवा पिढीला आपल्या अदांनी घायाळ करणारी फुलपाखरू फेम ऋता दुर्गुळे हिचे लाखो चाहते आहेत.
फुलपाखरू मालिकेतील वैदेहीची भूमिका प्रचंड गाजली होती. प्रोमो मध्ये ऋताचा चेहरा जरी लपविला असला तरी तिच्या फॅन्सना ओळखायला जास्त वेळ लागला नाही. तसेच, दुसऱ्या एका प्रोमो मध्ये चेहरा लपविण्यात आलेला अभिनेता अजिंक्य राऊत हा आहे. “विठू माउली” मालिकेत अजिंक्यने साकारलेली विठ्ठलाची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.
काही काळ टेलिव्हिजन पासून दूर राहणारा अजिंक्य परत एकदा नव्या भूमिकेत दिसून येणार आहे. आता येणाऱ्या नवीन मालिकेत या दोघांना किती प्रेम मिळू शकेल हे येणाऱ्या काळात समजेलच.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.