बॉलिवूडला हादरवून सोडणाऱ्या राज कुंद्रा प्रकरणात रोज नवीन नवीन गोष्टींचा उलगडा होत आहे. राज कुंद्रा वर अश्लील चित्रपट शूट करणे व ते एका ॲप वर प्रसारित केल्याचा गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. त्याच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे ठोस पुरावे असल्याचे समजते.
याप्रकरणा बद्दल इतके दिवस काहीही न बोललेेली राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीने अखेर तोंड उघडले आहे. शिल्पा शेट्टीने एक भावूक पोस्ट करताना असे म्हणाली, “गेले काही दिवस माझ्यासाठी प्रत्येक वेळी खूपच आव्हानात्मक होते. माध्यमांनी व माझ्या हितचिंतकांनी माझ्यावर बऱ्याच अनावश्यक गोष्टी बोलल्या.
मला बरेच ट्रोलिंग करीत प्रश्न विचारण्यात आले. फक्त मलाच नाही तर माझ्या कुटुंबाला देखील विचारण्यात आले. माझी प्रतक्रिया, मी अद्याप कसलीच प्रतिक्रिया दिली नाही आणि यापुढे देखील मी टाळत जाईन. कारण, ही न्यायालयीन प्रक्रिया आहे.” पुढे शिल्पा म्हणाली, “कृपया माझ्या बद्दल काहीही खोटे प्रदर्शित करू नका.
कधीही कोणाबद्दल तक्रार करू नका व कधीही कोणाला समजावू नका. या माझ्या तत्वाची पुनरावृत्ती करतेय. मी इतकेच म्हणेन की ही तपासणी चालू असल्याने मला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. एक कुटुंब म्हणून आम्ही सर्व उपलब्ध कायदेशीर उपायांचा अवलंब करत आहोत.
परंतु, तोपर्यंत मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते, विशेषतः आई म्हणून माझ्या मुलांच्या भविष्यासाठी आमच्या गोपनीयतेचा आदर करा.” “तुम्हाला विनंती करते की सत्यता पडताळल्या शिवाय टिप्पणी करणे थांबवा. मी कायद्याचे पालन करणारी भारतीय नागरिक आहे. गेली 29 वर्षे एक मेहनती व्यावसायिक आहे.
लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी कोणालाही निराश केले नाही. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा. कृपया कायद्याला मार्ग दाखवू द्या. सत्यमेव जयते!” अशा भावूक शब्दात विनाकारण ट्रोल करणाऱ्या फॅन्सना शिल्पा शेट्टीने विनंती केली.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.