गेल्या वर्षभरात मराठी अभिनय क्षेत्रातील काही कलाकारांनी बाळाची आनंदाची बातमी फॅन्सना दिली होती. अभिनेता शशांक केतकर, सचिन देशपांडे, अभिनेत्री धनश्री काडगावकर अशा काही कलाकारांच्या घरी बाळाचे आगमन झालेले आपण पाहिले. आता आणखीन एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.
अनेक चित्रपट व मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री स्मिता तांबे हीने नुकतीच फॅन्सना आनंदाची बातमी दिली. स्मिताने अगदी जवळच्या मित्र परिवारासोबत हा कार्यक्रम साजरा केला. या कार्यक्रमाला शुभांगी गोखले, अदिती सारंगधर, रेशम टिपणीस, फुलवा खामकर या तिच्या जवळच्या मैत्रिणी उपस्थित होत्या.
या सर्वांनी कार्यक्रमात खूप धमाल केल्याचे दिसून आले. 18 जानेवारी 2019 रोजी स्मिताचा विवाह धीरेंद्र द्वीवेदी या व्यक्ती सोबत झाला होता. काल दिनांक 30 जुलै रोजी स्मिताचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. स्मिताचा जन्म 11 मे 1983 रोजी झाला होता. त्यानुसार वयाच्या 38 व्या वर्षी स्मिता बाळाची आई होणार आहे.
अनेक कलाकारांनी स्मिताला तिच्या होणाऱ्या बाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. जोगवा, गणवेश, 72 मैल-एक प्रवास अशा अनेक मराठी चित्रपटात स्मिताने उत्तम भूमिका साकारल्या आहेत. 72 मैल-एक प्रवास चित्रपटातील स्मिता राधाक्का ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.
नुकतीच तिची झी मराठी वाहिनीवरील “लाडाची मी लेक ग” ही मालिका येऊन गेली आहे. त्या मालिकेतील तिने मम्मीची भूमिका साकारली होती.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.