धक्कादायक राज कुंद्रा प्रकरणामुळे या मराठी अभिनेत्याची बदनामी “माझा फोटो लावून”

बॉलिवूडला हादरवून टाकणाऱ्या राज कुंद्रा अटक प्रकरणात रोज नवीन नवीन गोष्टींचा उलगडा होत आहे. आता या प्रकरणात एका मराठी अभिनेत्याचे नाव विनाकारण ओढले गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नावात साम्य असल्याने हा घोळ झाला असला तरी अभिनेत्याने मात्र संबंधित न्यूज चॅनेल वर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

बाळकडू फेम अभिनेता उमेश कामत याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली, “ज्यात त्याने असे लिहिले, आज राज कुंद्रा प्रकरणात चालू असलेल्या बातमीत, या प्रकरणाचा एक आरोप “उमेश कामत” या व्यक्तीचा फोटो समजून माझा फोटो लावण्यात आला आहे. कोणतीही शहानिशा न करता वृत्त वाहिन्यांनी या प्रकरणात माझा फोटो लावून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे.

या सर्व गोष्टींमुळे होणाऱ्या माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक हानीसाठी या न्यूज चॅनेलला जबाबदार धरण्यात येईल.” तसेच, उमेश याने संबंधित आज तक चॅनेलवर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात असल्याचे सांगितले. या सर्व प्रकरणामुळे उमेश व त्याच्या कुटुंबाला संपूर्ण देशभरातून कॉल द्वारे प्रश्न विचारण्यात येत आहेत.

मीडियाने बेजबादरपणे त्याच्या फोटोज् वापर करून त्याची खूप नुकसान केले असल्याचे उमेश कामतने पुढे म्हटले आहे. “मी एक गोष्ट स्पष्ट करण्यासाठी हे सर्व सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे कारण राज कुंद्राच्या केस मध्ये सहभागी असलेला उमेश कामत मी नाही. मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी याच गोष्टीला खरे समजावे.

मला खात्री आहे की मला तुमचा पाठिंबा असेल” असे म्हणत अभिनेता उमेश कामतने आज तक या वृत्त वाहिनीला एक इशारा दिला आहे. त्याच्या पोस्टला अनेक मराठी कलाकारांनी समर्थन दर्शविले आहे.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *