मराठी मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी येणाऱ्या काही दिवसात झी मराठीकडून एक मोठे सरप्राइज मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांकडून सातत्याने झी मराठी वाहिनीच्या मालिकांबद्दल संताप व्यक्त केला जात होता. परंतु, आता या चॅनेल कडून मोठे फेरबदल करण्यात येत असून काही मालिकांचे सुंदर प्रोमोज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
कालपासून प्रसारित करण्यात येत असलेल्या “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेच्या प्रोमोने अनेकांचे मन जिंकले आहे. या प्रोमो मधील त्या गोड चिमुकलीचे सर्वजण भरभरून प्रशंसा करताना दिसून येत आहेत. या मालिकेत अभिनेत्याच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे असणार असून नायिकेच्या भूमिकेत कोण असणार हे जाणून घेऊयात.
“माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेत नायिकेच्या भूमिकेत लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे दिसून येणार आहे. आपल्या सौंदर्याने व अभिनयाने युवा पिढीचे आकर्षण ठरलेल्या प्रार्थनाने बऱ्याच वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. प्रार्थनाने तिच्या अभिनयाची सुरुवात पवित्र रिश्ता या मालिकेतून केली होती.
2017 मध्ये ती शेवटचे छोट्या पडद्यावर “लव्ह लग्न लोचा” या मालिकेत दिसून आली होती. प्रार्थना बेहरेने मितवा, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, कॉफी आणि बरेच काही, फुगे अशा काही लोकप्रिय चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच, काही हिंदी चित्रपटातून देखील तिने आपल्या अभिनयाच्या छाप पाडली आहे. आता “माझी तुझी रेशीमगाठ” मालिकेच्या प्रोमो मधील लहान मुलगी ही प्रार्थनाची असणार आहे, असे समजते.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.