सध्या देशभरात चर्चेचा विषय असलेल्या राज कुंद्रा प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसून येत आहेत. या प्रकरणात एकीकडे राज कुंद्रा याला अटक झाली होती तर दुसरी कडे मराठी अभिनेता उमेश कामत याची मीडियाद्वारे विनाकारण बदनामी झालेली पाहायला मिळाली.
वैतागलेल्या अभिनेता उमेश कामत याला समर्थन करणाऱ्या मराठी अभिनेत्रीलाच एक नेटकरी ट्रोल करताना दिसून आला. राज कुंद्रा प्रकरणात एका व्यक्तीचे नाव उमेश कामत असल्याने आज तक या न्यूज चॅनेलने मराठी अभिनेता उमेश कामत याच्या फोटो प्रदर्शित केल्या.
यामुळे उमेशने मीडिया विरुद्ध एक पोस्ट करीत आवाज उठविला. अभिनेत्री क्रांती रेडकर हीने याच संदर्भात एक पोस्ट करताना ती यामध्ये उमेशच्या सोबत असल्याचे म्हटले आहे. या पोस्ट वर एका युझरने “तुमचा आयपीएल मॅटर” असे हसत कमेंट करून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्या युझरला क्रांतीने चांगलेच फटकारले. “यात हसण्यासारखे काय आहे.
बत्तीशी जपून ठेवा, जास्त बाहेर काढली तर कधीही कोणाचा मुक्का बसू शकेल. आणि बसला तर बत्तीशी घशात जाईल” अशा शब्दात क्रांतीने त्या व्यक्तीला सुनावले. काही वर्षांपूर्वी क्रांती बाबतीत देखील उमेश सारखाच प्रसंग घडला होता. त्यावेळी मीडियाद्वारे क्रांतीचे नाव विनाकारण आयपीएल मॅच फिक्सिंग मध्ये घेण्यात आले होते.
“मी कोणत्याच क्रिकेटरला ओळखत नसून मी पण इतरांसारखे फक्त टिव्हीवरच क्रिकेट पाहते” असे त्यावेळी क्रांतीने म्हटले होते. याच कारणाने ती कमेंट पाहून क्रांतीचा राग वाढला.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.