खरंतर काही वर्षात ऋतुचक्र सातत्याने बदलत आहे. जगाला अशा महाभयंकर वादळाचा, पुराचा सामना सातत्याने करावा लागत आहे. त्यातच नासाने एक धोक्याचा इशारा दिला आहे. चंद्रामुळे पृथ्वीवरती विनाशकाली महापूर येईल अशी भीती नासाने व्यक्त केली आहे. चंद्रामुळे पृथ्वीला महाप्रलयाच ग्रहण? ९ वर्षानंतर चंद्र जागा बदलणार? पृथ्वीवर येणार विनाशकाली महापूर? जेव्हा प्रलयाची सुरुवात होते तेव्हा सगळीकडे दिसतो.
तो फक्त निसर्गाचा हाहाकार. सागरी किनाऱ्यावर येणारे वादळ आणि महापूर तसं नवं नाही. समुद्राच्या महाकाल लाटा संपूर्ण शहर उध्वस्त करून टाकतात. आता जे आपण जाणून घेणार आहोत ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल. येत्या काळात पृथ्वीवर एक संकट येणार आहे ज्यामुळे सगळी पृथ्वीचं जलमय होणार आहे. पृथ्वीवरच्या या विनाशकाली महाप्रलयाला कारणीभूत असेल साडेतीन लाख किमी दूर असलेला चंद्र. नासाच्या
अभ्यासानुसार २०३० मध्ये समुद्राच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल. यामुळे समुद्राला प्रचंड भरती येईल ज्यामुळे पृथ्वीचा बराचसा भाग जलमय होईल. या विनाशकाली महाप्रलयाच कारण असेल चंद्र. कारण चंद्र आपली जागा बदलत असल्याने अक्राळ विक्राळ भरतीच्या लाटा धडकणार आहेत. या ओशन मध्येच सारखे फ्लट्स यायला लागले आहेत, तर हे फ्लट्स आता वाढणार आहे आणि पुढच्या ९ ते १२ वर्षांमध्ये याचा उद्रेक होऊन.
महाप्रलय येऊ शकतो. नेचर जनरल मध्ये नासाचा हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. नासाची भविष्यवाणी खरी ठरली तर किनारी भागात सातत्याने पूरस्थिती निर्माण होईल. शिवाय या महाप्रलयामुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण खूप जास्त असेल. घर,रस्ते, सार्वजनिक ठिकाणे पाण्याखाली जातील, सततच्या प्रलयामुळे लोकांचं जगणं कठीण होऊन बसेल.
चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे समुद्रात भरती ओहोटीची प्रक्रिया सुरू असते. चंद्रामुळेच आतापर्यंत समुद्र संतुलित राहिला होता पण चंद्राने आपल्या कक्षेत जराही बदल केला तर हे संतुलन बिघडणार. नासाच्या दाव्यानुसार जर चंद्र साडे अठरा वर्षांनी मूळ जागेपासून हलकासा सरकतो, अर्ध्या काळात तो समुद्राच्या लाटांवर दबाव निर्माण करतो तर अर्ध्या काळात लाटांचा वेग वाढवतो. नासाच्या म्हणण्यानुसार आता लाटांचा वेग वाढण्याचा काळ आहे. ही प्रक्रिया
२०३० पर्यंत सुरू राहील. या काळात समुद्राची पातळी प्रचंड प्रमाणात वाढलेली असेल आणि असं झालं तर मोठ्या विनाशाची शक्यता आहे. खरंतर ज्या चंद्राला कवीच्या विश्वात एक वेगळं स्थान दिलेलं आहे तोच चंद्र आता आपलं स्थान बदलू लागलाय आणि हे अखेर मानवी विश्वाला कुठेतरी घातक ठरणार आहे आणि त्यामुळे नासाच्या या अभ्यासानंतर, या निष्कर्षानंतर प्रत्येक देशाला या महाप्रलयाच्या संकटाची तयारी करावी लागणार आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.