वायरल सत्य बापरे असं जीवघेणं फोटोशूट? संपूर्ण व्हिडीओ पहाल तर चकित व्हाल

धोक्याच्या ठिकाणी सेल्फी काढू नका असं सांगितलं जातं तरीदेखील काहीजण सेल्फी काढतच असतात. असाच एक फोटो वायरल होतोय. कड्यावर एक कपल फोटो काढत असल्याचं दिसतंय. पण हा फोटो आहे कुठला? आणि हा फोटोशॉप करण्यात आलाय की खरंच धोकादायक जागा आहे.

काय सत्य समोर आलंय जाणून घेऊया. सोशल मीडियावर वायरल होत असलेला हा फोटो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. हा फोटो वायरल झाल्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यानी दोघांना चांगलच धारेवर धरलं. काहींनी तर यांची टिंगलही उडवली. हा फोटो निरखून पाहिल्यानंतर याच्या मागचं सत्य समोर आले.

नीट पाहिल्यानंतर हा फोटो खरा आहे हे स्पष्ट होते.यावेळी अधिक माहिती मिळाली. हा सेल्फी पॉइंट बनवण्यात आलंय. याठिकाणी अनेक लोक फोटो काढण्यासाठी येतात. या कड्याच्या खाली अजून एक छोटी जागा आहे. त्यामुळे वरून जरी कोणी खाली कोसळलं तरी जीवाला धोका नाही. यामुळे अनेकजण इथे फोटोशूट करायला येतात.

त्या फोटोत दिसत असलेलं ठिकाण तूर्कितील आहे. गुलेक महलमध्ये हे फोटोशूट करण्यात आलंय. फोटो टॉप अँगलने काढल्यामुळे ठिकाण धोकेदायक वाटतं. कड्याच्या खाली जागा असल्याने लोक बिनधास्तपणे फोटोशूट करतात.

जरी फोटोत जीवघेणं धाडस दिसत असल तरी हे ठिकाण सुरक्षित आहे. त्यामुळे लोक इथे फोटो काढण्यासाठी गर्दी करतात. पण असं असलं तरी अशा जीवघेण्या ठिकाणी फोटो काढण्याचा अट्टाहास करू नका.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *