माणसाला शिर नसेल तर तो कसा काय चालू फिरू शकेल? पण गर्दीतल्या रस्त्यावर शीर नसलेली व्यक्ती फिरत असल्याचा विडियो वायरल होतोय. शीर नसलेली व्यक्ती ही आहे तरी कोण? खरंच या व्यक्तीला शीर नाहीये का? पुण्यासारख्या गर्दीच्या शहरात ही व्यक्ती फिरत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला गेलाय पण खरच ही व्यक्ती पुण्यात फिरतेय का?
पुण्यात गल्ली गल्लीत गर्दी, रस्त्यावर ट्रॅफिक जाम हे आपल्याला नित्याचेच. पण अशातच अचानक गर्दीत रस्त्यावर डोके म्हणजेच शीर नसलेला माणूस दिसला तर चर्चा झाली असती, पण अशी कोणतीही चर्चा नाही, बातमी नाही. मग ही शीर नसलेली व्यक्ती आहे तरी कोण? ही व्यक्ती ट्रॅफिक मधून वाट काढताना दिसली.
अंगावर लेदरचे जॅकेट, थ्री फोर्थ पँट, पायात चप्पल आणि हातात लाल पिशवी. या पिशवीत या माणसाचं शीर तर नाही ना? असाही प्रश्न अनेकांना पडला. मात्र ट्रॅफिक आहे, गाड्या ये जा करत आहेत, कोणीही या माणसाला घाबरत नाहीये म्हणून वीडियो निरखून पाहिले पण या विडियोत चिनी भाषेत लिहलेले बोर्ड दिसून आले. त्यावेळी सत्य समोर आले.
हा विडियो पुण्यातला असल्याचा दावा केला असला तरीही हा पुण्यातला नसून चीनचा वीडियो आहे. संबंधित व्यक्तीने शीर नाही हे दाखवण्यासाठी एक ट्रिक वापरली आहे. वीडियो एडीटेड असून, यु ट्यूबवर अपलोड केला गेलाय. सध्याच्या घडीला अनेकजण यू ट्यूबचा वापर करतात. आपल्या चॅनल चे सबस्क्राईब वाढावेत यासाठी काहींना ही ट्रिक वापरावी लागते.
अशाच प्रकारे ही ट्रिक वापरण्यात आली आहे. आणि शीर नसलेली व्यक्ती रस्त्यावरून चालतेय असे दाखवण्यात आले. पण असं काहीही नसून लोकांची दिशाभूल करण्यात आली आहे. त्यामुळे असे वीडियो पाहून विश्वास ठेवू नका.