घरातील उपकरणं तपासा LED मोबाईल चार्जरमध्ये स्पाय कॅमेरा पुण्याच्या भारती विद्यापीठातील प्रकार

सगळ्यांना सावध करणारी बातमी. हॉटेलमध्ये, मॉलच्या बाथरुममध्ये सीसीटिव्ही कॅमेरे लावलेले तुम्ही ऐकले असेल पण तुमच्या स्वतःच्या घरातल्या बाथरुममध्ये किंवा हॉलमध्ये एखादा अनोळखी माणूस येऊन स्पाय कॅमेरा लावून गेलाय असं कोणी म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण असं घडलंय. ते महाराष्ट्रात

कुठे घडलंय जाणून घेऊयात. तुमच्या घरात स्पाय कॅमेरा? बाथरूम, हॉल मधली उपकरणं चेक करा. स्पाय कॅमेरा असलेला LED बल्ब तुमच्या घरात देखील असू शकतो. ज्याची नजर तुमच्यावर असू शकते. फक्त LED बल्बच नाही तर तुमच्या मोबाईल चार्जर देखील एकदा नीट

तपासा, कारण या एवढ्याशा मोबाईल चार्जर मधून देखील कुणीतरी तुमच्यावर नजर ठेवून असू शकते. कारण असाच प्रकार पुण्याच्या भारतीय विद्यापीठात घडला आहे. साधा दिसणारा LED बल्ब आणि मोबाईलच्या चार्जर मध्ये चक्क स्पाय कॅमेरा लपवल्याच समोर आलंय.

पुण्यातील भारती विद्यापीठातील कॅम्पस मध्ये राहणाऱ्या ३१ वर्षीय डॉक्टर महिलेच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे आढळले. त्या डॉक्टर सकाळी कामाला जातात आणि संध्याकाळी साधारण ६ वाजता घरी येतात.

सकाळी ९ ते संध्याकाळी ६ च्या दरम्यान कोणीतरी हा कॅमेरा लावून गेला. हा कॅमेरा कोणी लावून गेला हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे. त्यामुळे आता अतिदक्ष राहणे हेच आपल्या हाती आहे.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *