फाशी हा शब्द जरी ऐकला तरी मनात असंख्य प्रश्न येतात. आरोपीला फाशी कशी दिली जाते? फाशीवेळी कोणकोण असतं? फाशीची प्रक्रिया नेमकी काही असते? आणि फाशी सूर्योदयापूर्वीच का दिली जाते? आणि फाशी देत असताना त्या आरोपीची मानसिक स्थिती नेमकी असेल? असे अनेक प्रश्न आपल्याला कधी ना कधीतरी पडले असतीलच. याची उत्तरं शोधणारआहोत वेब विशेष मध्ये.
आपल्या देशात मृत्युदंडाची म्हणजेच फाशीची शिक्षा सर्वोच्च मानली जाते. फाशीच्या शिक्षेवर शिक्कमोर्तब झाल्यानंतर दंडाधिकारी फाशी द्यायची तारीख निश्चित करतात.त्यांनतर हा निर्णय जेल सुप्रीटेंडन ला कळवला जातो. ज्या कैद्याला फाशी द्यायची आहे त्याच्या नातेवाईकांना कळवण्याची जबाबदारी सुध्दा जेल सुप्रीटेंडनवर असते.
त्यानुसार कैद्याच्या नातेवाईकांना कळवल्या जातात. फाशी देण्याच्या आदल्या दिवशी कैद्याला त्याच्या आवडीचे जेवण दिलं जातं आणि फाशी नेहमी सूर्योदयावेळी दिली जाते. फाशीच्या एक तास आधी त्याला अंघोळ करायला सांगितले जाते. नवीन कपडे दिली जातात. कोठडीतून बाहेर पडल्यानंतर त्याचा चेहरा काळया कापडाने झाकला जातो. दोन्ही हात मागे बांधले जातात.
ती प्रक्रिया सुरू असते तेव्हा जेल मधल्या अन्य कैद्यांना जेल मध्येच ठेवले जाते. त्यांना बाहेर यायला मनाई असते. मात्र यावेळी जेलमधील वातावरण भयावह असते. हे भयंकर वातावरण नेमकं काय असतं? फाशीच्या वेळी जेल सुप्रीटेंडन कार्यकारी, दंडाधिकारी, फाशी देणारा जल्लाद आरोपीच्या कानात आणि डॉक्टर उपस्थित असतात. याशिवाय फाशी दिली जात नाही.
सर्वात मोठे आणि सर्वात कठीण काम जल्लादाच असतं. फाशी देण्यापूर्वी फाशी देणारा गुन्हेगारीच्या काळातही संदेश देतो. हिंदूना रामराम आणि मुस्लिमांना सलाम असा हा जल्लाद आरोपीच्या कानात म्हणतो. मी माझ्या कर्तव्यासमोर मजबूत आहे, मी तुमच्याकडून सत्याच्या मार्गाने चालण्याची इच्छा व्यक्त करतो. हे म्हटल्यावर ते चबूतरे जोडलेले लिबर खेचतो.
हा सगळा प्रकार घडतो सूर्योदयापूर्वी. पण सूर्योदयापूर्वीच फाशी का देतात? यामागे तीन कारणे आहेत. पहिले कारण आहे प्रशासकीय व्ययस्था. न्यायालयाने सुनावलेल्या दिवशी २४ तासांच्या आत जर जेल प्रशासन गुन्हेगाराला फाशी द्यायला अपयशी ठरली तर पुन्हा न्यायालयाकडे नवीन तारीख मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो. तसेच हे करू वेळेत पूर्ण न करणे म्हणजे न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान समजला जातो.
त्यामुळे ठरलेल्या दिवशीच पहाटेच फाशी आटोपली जाण्याची प्रथा सुरू झाली. दुसरे कारण आहे नैतिकता. असं मानलं जातं की ज्याला फाशी होणार आहे त्याला पूर्ण दिवस वात बघायला लावल्यामुळे त्याच मानसिक खच्चीकरण होतं. त्यामुळे भीतीने किंवा वेडाने स्वतःला इजा करून घेऊ शकतो आणि फाशीच्या कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो.
आणखी एक कारण असेही आहे की सकाळी फाशी दिल्यानं सूर्योदयापूर्वी गुन्हेगाराच मृत शरीर त्याच्या कुटुंबीयांना सोपवल्यामुळे ते वेळेत त्याचे अंतिम संस्कार करू शकतात आणि तिसरं कारण
आहे सामाजिक कारण. गुन्हेगाराचे जर सामाजिक प्रभाव अधिक असेल तर त्यामुळे सामाजिक जीवन अस्ताव्यस्त होण्याची शक्यता असते. पहाटे सामाजिक जीवन आणि खासकरून मीडिया क्षेत्र शांत असल्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नसते. त्यामुळे फाशी पहाटे दिली जाते.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.