साऊथ आफ्रिकामध्ये महिलेकडून १० मुलांना जन्म नक्की पहा

जुळी नाही, तिळी नाही तर चक्क १० पोरे. दक्षिण आफ्रिकेत महिलेकडून १० मुलांना जन्म. एकाचवेळी सर्वाधिक मुलं जन्माला घालण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड. आपल्याकडे गर्भवतीला जुळी मुले, तिळी मुलं झाल्याचं ऐकलं असेल, पण

एकाचवेळी एकाच महिलेने १० मुलांना जन्म दिल्याचं तुम्ही ऐकलंय? दक्षिण आफ्रिकेत असा एक प्रकार घडलाय. इथं एका गर्भवतीने चक्क १० चिमुरड्यांना जन्माला घातलय आणि हा आतापर्यंतचा मुलांना जन्म देण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड

मानला जातोय. गोसियामी धमारासिरोर असं या महीलेच नाव असून ती एकाचवेळी १० मुलांची आई झाली आहे. डॉक्टरांनी ६ सांगितली, गोसियामिला १० बाळं झाली. गोसीयामी ही ३७ वर्षांची आहे. तिने एकाचवेळी ७ मुलं व ३ मुलींना

जन्म दिलाय. गर्भवती असताना डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं की ६ बाळं होऊ शकतात. गोसियामीचा नवरा म्हटला होता की ८ बाळं होतील. मात्र जेव्हा ७ जूनला गोसियामीच सिजरियन झालं तेव्हा तिला तब्बल १० बाळं झाली.

त्यामुळे तिचा आनंद गगनात मावत नाहीये. गोसियामि गर्भवती होती तेव्हा तिला असह्य वेदना होत्या. डॉक्टरांनी तिला खूप जास्त काळजी घ्यायला सांगितली होती. मात्र इतकी मुलं गर्भात असल्यानं गोसियामीला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले.

शिवाय तिला चालताही येत नव्हते. डिलिव्हरी नंतर काही मुलं दगावण्याची शक्यता होती पण सुदैवाने सगळं काही चांगलं झालं आणि आता सगळी चिमुरडी सुखरूप आहेत. महिनाभरात सर्वाधिक मुलं जन्माला घालण्याचा रेकॉर्ड तुटला.

गोसियामीच्या आधी मोरोकोच्या हलिमा सिसी नावाच्या महिलेला ९ मुलं झाली होती. त्यातील ५ मुळी व ४ मुले होती. त्यामुळे सर्वाधिक मुलांचा रेकॉर्ड तिच्या नावावर होता. मात्र गोसियामिन महिना भरातच हा रेकॉर्ड मोडला.

आता गोसियामीची सर्व मुले सुरक्षित आणि स्वस्थ आहेत. लवकरच या सर्वांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *