“भारत बदलत आहे. लोक जाती धर्माच्या पलीकडे जात आहेत. त्यामुळे पारंपरिक बंधन कमी होताना दिसत आहेत. अशावेळी लग्नानंतर घटस्फोट घेण्यासारख्या काही प्रकरणात तरुणांना अडचणी येऊ शकतात. त्यातून मार्ग काढण्यासाठी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची गरज आहे” असे मत दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश प्रतिमा सिंह यांनी व्यक्त केलं आहे.
तुमच्या या विधानाने देशात पुन्हा एकदा समन नागरी कायद्याबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे. पण हा समन नागरी कायदा नेमका काय आहे? समान नागरी कायदा अर्थात युनिफॉर्म सिविल कोड लागू करण्याचा विचार आणि त्यावरचा वाद भारतात अनेक वर्षापासून सुरू आहे. सर्व धर्मातील लोक एकसारखेच राहतील, त्यांना एकसारखेच नियम असायला हवेत असा या कायद्याला पाठिंबा देणाऱ्यांची म्हणणे आहे.
सप्टेंबर २०२० मध्ये लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजप खासदार निशिंकात दुबे यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी केली होती. यामुळे सर्व नागरिक भारतीय असतील. कोणी हिंदू, मुस्लिम किंवा ख्रिश्चन असं वेगळे असणार नाहीत असे दुबे त्यावेळी म्हणाले होते. भारतात आजच्या घडीला मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशी समाजासाठी स्वतंत्र पर्सनल लॉ लागू आहेत तर हिंदू सिविल लॉ अंतर्गत हिंदू,
शिख,जैन आणि बौद्ध धर्मीयांवर कायदे लागू आहेत. त्यामुळे युनिफॉर्म सिविल कोड म्हणजेच असा एक निःपक्ष कायदा ज्याचा कुठल्याही धर्मातील लोकांना झुकत माप देण्याचा विचार नसेल. समन नागरी कायदा लागू झाल्यास काय होईल? भारतीय राज्यघटनेनुसार लग्न,संपत्ती, वारसा हक्क यासारखे कुटुंब केवळ व्यक्तीशी संबंधित प्रकरण नागरी कायदा अंतर्गत येतात. आणि
घटनेतील कलम ४४ अन्वये समान नागरी कायदा लागू करण्याची जबाबदारी राज्यांवर आहे. मात्र यावरून कायमच वाद सुरू असतो आणि त्यामुळेच आजवर कुठलेही मोठे पाऊल उचललं गेलं नाही. सुप्रीम कोर्टातील वकील विराग गुप्ता सांगतात की, ” समान नागरी कायदा अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आगामी काळात समान नागरी कायद्याच्या दिशेने आपण प्रयत्न करू असे राज्य घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये उल्लेख आहे.
मात्र त्या दिशेने आजपर्यंत कुठलेही पाऊल उचललं गेलं नाही” याच कारण म्हणजे दक्षिण भारत,ईशान्य भारत किंवा आदिवासी भागांमध्ये लग्न परंपरा वेगवेगळ्या असतात. वारसा हक्कांच्या परंपरा सुध्दा वेगवेगळ्या असतात. उदा. मुस्लिम पर्सनल लॉ अंतर्गत वडिलांच्या किंवा पतीच्या संपत्तीवर तेवढा अधिकार नसतो जेवढा हिंदू सिविल लॉ नुसार महिलांना असतो.
अल्पसंख्याकांना समान नागरी कायद्याची भीती? समान नागरी कायद्याबाबत सर्वात मोठी अडचण म्हणजे भारतातील बहुस्तरीय सामाजिक रचना ज्यात मोठ्या प्रमाणात विरोधाभास सुध्दा आहे. वकील वीराग गुप्ता म्हणतात की, “समान नागरी कायद्याबाबत चर्चा होताना कायमच हिंदू आणि मुस्लिमाबाबत बोललं जातं. तसचं मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजा मधल्या भितीचीही चर्चा होते.
मात्र भारतात अनेक समाज, अनेक वर्ग, अनेक परंपरा आहेत. त्यामुळे समान नागरी कायदा लागू झाल्यास सर्वच समाजांच्या परंपरेमध्ये गोंधळ निर्माण होईल आणि पर्यायाने अडथळे येतील” अशी एक शक्यता ते बोलून दाखवतात. मुस्लिम लॉ बोर्डाचे काय म्हणणे आहे? मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव जाफरायाब जिलानी यांच्या म्हणण्यानुसार शरियत कायदा ही अल्लाची देणगी आहे मानवाची नाही.
ते सांगतात, “आमच्या शरीयत कायदा ही कुराण आणि हदीसवर आधारित आहे. त्यामुळे कुठलीही संसद यात दुरुस्ती करू शकत नाही आणि केली तर ती आम्हाला मान्य नाही. हे आम्ही खूप आधीपासूनच सांगत आलोय आणि यावर आजही ठाम आहोत”. जीलानी सांगतात की शरीयत कायद्यानुसार आमचं भविष्य सुरक्षित आहे. जर आणखी कुठला कायदा असेल तर आम्हाला अडचणी येतील.
आमच्या महिलाही समान कायद्याच्या विरोधात आहेत.असे ते म्हणाले. ख्रिश्चन आणि समान नागरी कायदा. अखिल भारतीय ख्रिश्चन परिषदेचे सरचिटणीस जॉन दयाल यांनी बीबीसी शी बोलताना सांगितले की हिंदू मध्येही समान नागरी कायदा नाहीये. दक्षिण भारतातील हिंदू समाजात एका गटात मामा भाचीच्या लग्नाला सुध्दा परवानगी आहे मात्र हरियाणात कुणी असे केले तर लगेचच त्यांची हत्या केली जाते.
हिंदूंमध्ये शेकडो जाती आहेत. त्यांच्या लग्नांच्या परंपरा वेगवेगळ्या आहेत. दयाल सांगतात की, “ख्रिश्चनांमध्येही कॉमन सिविल कोड आहे. मात्र अनेक ख्रिश्चन आपापल्या जातीमध्येच लग्न करू पाहतात. आमच्यात रोमन कॅथलीक सुध्दा आहेत आणि प्रॉटेस्टंटही मी रोमन कॅथलीक आहे आणि आमच्यात घटस्फोट ही पद्धत नाही. लग्न आमच्यात जन्मोजन्मीच बंधन आहे. दुसरीकडे प्रॉटेस्टंट मध्ये तलाक पद्धत आहे”.
यांच्या म्हणण्यानुसार समान नागरी कायदा लागू केल्यास देशातील कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करावे लागतील आणि हे सर्व अडचणीचे आणि आव्हानात्मक असेल शिवाय ही प्रक्रिया एका झटक्यात पूर्ण होणारी नाही. ती लांबलचक, किचकट प्रक्रिया असेल.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.