अमेरिकेतली हवामानाचा अंदाज व्यक्त करणारी वेबसाईट स्पेसवेदर डॉट कॉम वर सध्या एक इशारा झळकतोय. सूर्याच्या वातावरणात तयार झालेलं एक वादळ अती प्रचंड वेगाने अंतराळात फिरून पृथ्वीच्या दिशेनं सरकतय आणि ते पृथ्वीवरही धडकू शकते. पण सोलार स्टॉर्म किंवा हे सौर वादळ नेमकं असतं काय? यामुळे आपल्यावर नेमका काय परिणाम होणार आहे?
यामुळे पृथ्वीवरचं तापमान अचानक वाढेल का? इंटरनेट, जीपीएस बंद पडेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये. अमेरिकेतल्या अंतराळ संस्था नासानेही या येऊ घातलेल्या सौर वादळाबद्दल बरीच माहिती दिली आहे. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ३ जुलैला सकाळी १० वाजून २९ मिनिटांनी सूर्याच्या वातावरणात एक मोठा स्फोट होऊन वादळ तयार झालं आणि ते प्रती तास १.६ मिलियन किमी वेगाने अंतराळात फिरतय.
या वेगाने रविवार (११ जुलै) किंवा सोमवार (१२ जुलै) ला ते पृथ्वीवर धडकू शकेल. विचार करा सूर्यापासून पृथ्वी ९ कोटी ३० लाख मैल दूर आहे. पण या सौर वादळाचा वेगच असा आहे की ९ दिवसात ते पृथ्वीच्या जवळ येऊन ठेपलय. नसातल्या शास्त्रज्ञांनाच्या मते सूर्याच्या वातावरणात झालेला स्फोट १०० मेघाटन क्षमतेचे हायड्रोजन बॉम्ब फुटण्याइतका मोठा होता.
आणि त्यातूनच आपल्याला या वादळाच्या तीव्रतेची कल्पना येऊ शकते. पण मुळात सौर वादळ म्हणजे काय? आणि पृथ्वीवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? सोप्या शब्दात सांगायचं तर सूर्याच्या पृष्ठभागावर असलेले सन स्पॉट्स म्हणजेच चमकणाऱ्या ठीपक्या मधून चुंबकीय ऊर्जा उत्सर्जित होत असते त्यांचा सूर्याभोवतालच्या वातावरणात झालेला स्फोट म्हणजेच सौर वादळ.
या स्फोटातून तयार झालेलं वादळ कधी कधी सूर्याचं चुंबकीय क्षेत्र ओलांडून सौर मालिकेत सगळीकडे पसरते आणि तसचं काहीस आत्ता झालंय. मोठ्या क्षमतेच्या या वादळामुळे ते सूर्यापासून अंतराळात प्रवास करून थेट पृथ्वीच्या दिशेने सरकतय. साधारणतः सूर्याचं जो पृष्ठभाग पृथ्वीच्या दिशेला असतो त्या पृष्ठभागावर झालेले स्फोट पृथ्वीवरून दिसू शकतात किंवा अनुभवता येतात.
पण त्यांचा पृथ्वीवर थेट परिणाम होतोच असे नाही. कारण ती अंतराळातच विरतात. पण आत्ताचं वादळ वेगळं का आहे? किंवा ते वेगळं आहे का? सौर वादळाची क्षमता किंवा तीव्रता ही इंग्रजी अक्षरांवरून मोजली जाते. म्हणजे A to Z. यातलं A- सगळ्यात कमी क्षमतेच वादळ तर X- खूप मोठ्या क्षमतेचे वादळ. आत्ताच्या वादळाची तीव्रता शास्त्रज्ञांनी X1 असल्याचा म्हटलंय.
यावरून तुमच्या लक्षात येईल की तीव्रता किती आहे. म्हणून यावेळी पृथ्वीवरही वादळाचा दृश्य परिणाम दिसू शकतो. वादळ पृथ्वी पर्यंत पोहोचल्यामुळे पृथ्वी भोवतालच वातावरण गरम होऊन अंतराळातल्या उपग्रहांकडून येणारे संदेश खंडित होऊ शकतात किंवा विस्कळीत होऊ शकतात. जीपीएस, मोबाईल फोन, सॅटेलाईट टिव्ही या सेवांवर त्यामुळे परिणाम होऊ शकतो. पण जीपीएस बंद
पडण्याची शक्यता खूपच कमी असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलंय. वीज पुरवठ्यावर देखील याचा परिणाम होऊ शकतो आणि काही ठिकाणी विजेचे ट्रान्सफॉर्मर जळू शकतात.उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवरच्या देशांवर मात्र या काळात रात्रीच्या वेळी अवकाशात सूर्याचे अप्रतिम रूप दिसू शकतं. सौर वादळ ही घटना अंतराळ आणि विज्ञानाच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे.
आणि यावेळच्या वादळाची काय वैशिष्ट्ये आहेत ते जाणून घेऊया खगोल शास्त्रज्ञ प्रदीप नाईक यांच्याकडून. या सौर वादळामध्ये सूर्याकडून निघालेल्या उच्च ऊर्जा भारीत कण असू शकतात. यामध्ये खूप ऊर्जा असते आणि ते जेव्हा पृथ्वीच्या वातावरणावर आदळतात तर त्यावर काय परिणाम होतो हे महत्त्वाचे आहे. त्याप्रमाणे खगोलशास्त्र हे देखील बघत असते की सूर्याकडून हे वादळ केव्हा निघू शकेल,
कोणत्या प्रकारचं ते वादळ असेल किंवा पृथ्वीला विनाश करण्याची त्याची क्षमता किती आहे आहे त्याच्या दृष्टीने खगोलशास्त्र हे अतिशय महत्त्वाचे आहे. या आधीही अशी वादळे झाली होती. १९९०च्या सुमारास असं एक वादळ झालं होतं. त्यामुळे वीज गेलो होती.आपल्याला फारसे चिंता करण्याचे कारण नाही कारण पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.
आपल्याला कम्युनिकेशन मध्ये जरा अडथळा येईल. बाकी फारसा परिणाम होत नाही. थोडक्यात, सौर वादळ ही घाबरून जाण्यासारखी गोष्ट नाही. ११ वर्षात सूर्याच्या वातावरणात अशी १५०० च्या वर वादळे तयार होत असतात. आणि
त्यातील साधारण १५० वादळ ही आत्ताच्या वादळाच्या म्हणजे X तीव्रतेची असतात.
पण यावेळी पृथ्वीचा जो भाग सुर्यासमोर आहे तिथूनच हे वादळ येत असल्यामुळे ते पृथ्वीवर पोहोचण्याची शक्यता वाढली आहे. तज्ञांच्या मते,जेव्हा सौर वादळ पृथ्वीच्या समोर येतं तेव्हा अंतराळ शास्त्रज्ञांना आपल विश्व ज्या ताऱ्यांच्या भोवती फिरतं ते सूर्याची ओळख व्हायला उलट मदतच होते.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.