नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते मध्ये दररोज काही ना काही घडत असते. आता अरुंधती आणि अनिरुध्दच्या घटस्फोटाला अवघा एक आठवडा आहे. आपण जाण्याअगोदर यश आणि गौरीचा साखरपुडा व्हावा ही तिची मनापासून इच्छा आहे. या इच्छेला आजी देखील परवानगी देते.
अरुंधतीचा देशमुख कुटुंबातील हा शेवटचा सोहळा. या सोहळ्यात एका नवीन पात्राची एन्ट्री होत आहे. समृध्दी बंगल्यात गौरी यशच्या साखरपुड्याची तयारी सुरू आहे. अशावेळी आतापर्यंत कधीच न दाखवलेलं पात्र पहिल्यांदाच सगळ्यांसमोर येणार आहे.
आप्पा देखमुख यांचा दुसरा मुलगा आणि अनिरुद्धचा लहान भाऊ अविनाशची या मालिकेत एन्ट्री होत आहे. आतापर्यंत अविनाश देशमुख हे पात्र मालिकेत दाखवण्यात आलेलं नाही. पहिल्यांदाच अविनाश देशमुख प्रेक्षकांना भेटणार आहे.
अभिनेता शंतनु मोघे हा अविनाश देशमुख चे पात्र या मालिकेत साकारणार आहे. अनिरुद्ध आणि अविनाश पंजा लावताना दिसत आहेत. अनिरुद्ध अविनाशला म्हणतो की, मी जिंकलो तर काय देशील. त्यावर अविनाश म्हणतो तू मागशील ते आणि हरलास तर जे मी मागेन ते द्यावे लागेल. त्यावर अनिरुद्ध म्हणतो, ते बघू नंतर.
नंतर या दोघांमध्ये पंजा लावण्यात येतो. अविनाश अनिरुद्धला हरवतो. ठरल्याप्रमाणे अनिरुद्ध म्हणतो, काय हवे ते माग. यानंतर अविनाश दादाला हात जोडून या घरच्या लक्ष्मीला थांबव अस म्हणू लागतो. त्यानंतर अविनाश आणि अनिरुद्ध यांच्या या संवादानंतर सगळेच स्तब्ध होतात.
अरुंधती व अनिरुद्धचा घटस्फोट व्हावा असे कोणालाच वाटत नसते. मात्र अरुंधतीने आपल्या मनाची तयारी केली आहे. तर दुसरीकडे संजना गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाली आहे. या सगळ्यात अनिरुद्ध मात्र ठाम निर्णयापर्यंत पोहोचलेला नाही.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.