सुरू आजीच्या या म्हणी मुळे देवमाणूस मालिका होणार बंद

नमस्कार मित्रांनो, मराठी सिरीयल विश्वातील आणि कलाक्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. सर्वात पहिली बातमी संजय नार्वेकर यांच्याबद्दल आहे. मराठीतील लोकप्रिय अभिनेते संजय नार्वेकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यानंतरची बातमी देवमाणूस या मालिकेची आहे. देवमाणूस या मालिकेतील आर्या देशमुख म्हणजेच अभिनेत्री सोनाली पाटील यांनी काल कोरोनाची लस घेतली.

त्यानंतरची बातमी स्टार प्रवाहची आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवर जय भवानी जय शिवाजी ही मालिका २६ जुलै पासून सुरू होणार आहे. त्यानंतरची बातमी देवमाणूस मलिकेबद्दल आहे. देवमाणूस मालिकेवर एक वादग्रस्त टीका झालेली आहे. देवमाणूस मालिकेतील सरू आजीच्या एका म्हणीमुळे ही मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

तर १३ जुलै या देवमाणूस मालिकेच्या भागात सरू आजीच्या तोंडी एक म्हण दाखवली आहे. आपलीच म्होरी आणि अंघोळीला चोरी. अशी म्हण सरू आजी एका दृश्यात बोलताना दिसली आणि यावरून सोशल मीडियावर वेगळाच राडा सुरू झाला. सोशल मीडियावर या दृश्याचा आणि सरू आजीच्या संवादाचा वीडियो वायरल झाला. या विडियोत.

आपलीच म्होरी आणि अंघोळीला चोरी या संवादात अश्लील अपशब्द कानावर पडत असल्याचा दावा नेटकऱ्यानी केला. यानंतर मालिकेवर आणि वाहिनीवर टीका सुरू झाली. झी मराठी वाहिनी असे म्हणते की, हा खोडसरपणा आहे. वाहिनीचे नाव खराब करण्यासाठी हा वीडियो वायरल करण्यात आलाय. त्यात अश्लील शब्द वापरल्याचा दावा केला जातोय पण त्यात तथ्य नाही.

झी मराठी जबाबदार वाहिनी आहे आणि या नात्याने आम्ही मालिकेच्या संवादात कोणत्याही अश्लील संवादाचा वापर केला नाही असे झी मराठीने या पूर्ण प्रकारावर सांगितले आहे. त्यानंतरची बातमी आई कुठे काय करते या मालिकेची आहे.या मालिकेत आता अनिरुद्धच्या भावाची एन्ट्री झाली आहे. अनिरुध्दच्या भावाच्या भूमिकेत आपल्याला शंतनु मोघे या मालिकेत बघायला मिळणार आहेत.

त्यानंतरची बातमी मुलगी झाली हो या मालिकेची आहे. या मालिकेत अभिनेत्री रश्मी जोशी आपल्याला दिव्याच्या नवीन भूमिकेत बघायला मिळणार आहे. त्यानंतरची बातमी एक नवीन मालिकेची आहे. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांची मुख्य भूमिका असलेली नवीन मालिका झी मराठीवर किंवा स्टार प्रवाह या दोन चॅनल पैकी एका चॅनल वर आपल्याला नक्की बघायला मिळणार आहे.

त्यानंतरची बातमी पुन्हा एकदा नवीन मालिकेची आहे. सोनी मराठीवर आता लवकरच वैदही नावाची एक नवीन मालिका सुरू होणार आहे. या होत्या मराठी सिरीयल विश्वातील आणि कलाक्षेत्रातील महत्वाच्या बातम्या.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *