सुप्रसिद्ध अभिनेत्री एकता कपूर यांची नवी मालिका भाग्यलक्ष्मी झी टिव्ही वर सुरू होणार आहे. असं म्हणतात की, अभिनेत्री अंकिता लोखंडे ही एकता कपूर यांची फेवरेट हिरोईन आहे.
त्यामुळे कपूर यांची निर्मिती असलेल्या आगामी मालिकेत अंकिता लोखंडे झळकणार अस तुम्हाला वाटत असेल तर थांबा, गैरसमज करून घेऊ नका. अंकिता लोखंडे सध्या पवित्र रिश्ता २ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
भाग्यलक्ष्मी या मालिकेत एक मराठमोळी अभिनेत्री प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ती अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या खरे. ऐश्वर्या या मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्यासाठी खूप excited असल्याची चर्चा आहे.
ऐश्वर्याने याआधी जाने क्या होगा रामा रे, साम दाम दंड भेद, ये है चाहते अशा लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये अभिनय केला आहे. भाग्यलक्ष्मी या हिंदी मालिकेत ऐश्वर्या लक्ष्मी ही भूमिका साकारणार आहे.
एकता कपूर यांची नवी मालिका ३ ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार, रात्री ८.३० वाजता तुम्हाला झी टिव्ही वर पाहायला मिळेल.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.