कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढते आर्थिक संकट आणि महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चात आणखी भर पडणार आहे. वाढलेल्या डिझेलच्या किंमती आणि कोरोनामुळे झालेली व्यावसाय हानी लक्षात घेता एसटीचे प्रवास भाडे 17 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे येत्या काही दिवसांत लालपरीचा प्रवास महागणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) प्रवास भाडे वाढविण्याचा विचार करत आहे. वाढलेले डिझेलचे दर, कोरोनामुळे होत असलेलं आर्थिक नुकसान.
यामुळे महामंडळाने प्रवास भाडे 17 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव महामंडळानं तयार केला आहे. सध्या राज्यात दहा हजार बस धावत असून, दररोज आठ कोटी रुपयांचे उत्पन्न आहे. मात्र इंधन दर वाढ व घटलेली प्रवाशांची संख्या.
यामुळे महामंडळाला दररोज दोन कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. तुर्तास या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही मात्र, लवकरच भाडे वाढ लागू करण्याची शक्यता आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.