नमस्कार मंडळी, अग्गबाई सासूबाई या मालिकेमध्ये शुभ्राच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान या आता नवीन भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री तेजश्री ही आता निर्मिती क्षेत्राकडे वळली. म्हणजेच ती आता एक प्रोड्युसर निर्मातीच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच सोशल मीडियावरून अभिनेत्री तेजश्रीने तिच्या नवीन निर्मिती संस्थेची घोषणा केली.
या संस्थेचे नाव आहे ‘ टेक ड्रीम्स प्रोडक्शन ‘. ही संस्था तेजश्री प्रधान आणि तिची मैत्रीण किर्ती नेरकर हा दोघींनी मिळून सुरू केली. टेक या नावात या दोघींच्याही नावाचे अक्षर वापरले जाते. या संस्थेची घोषणा करताना अभिनेत्री तेजश्री म्हणाली की, माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी काहीतरी खास आहे.
मी आणि माझी मैत्रीण किर्ती नेरकर काहीतरी वेगळं करण्याबद्दल बोलायचो, आमच्या आवडीचा कन्टेन्ट तयार करण्याबद्दल आणि अस काहीतरी लिहिण्याबद्दल जे जादुई असेल असेल. अखेरीस आमच्या रोज रात्रीच्या बोलण्याला, विचारांच्या देवाणघेवाणीला, कल्पनांना आणि स्वप्नांना एक चेहरा मिळालाय. मला आमचं स्वप्न तुमच्यासमोर सादर करायला प्रचंड आनंद होतोय..
आमची निर्मिती संस्था ‘ टेक ड्रिम्स प्रोडक्शन ‘ यासाठी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्यासोबत असूद्या. असं अभिनेत्री तेजश्रीने म्हटलंय. यावर तिला अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पण अभिनेत्री तेजश्रीच्या चाहत्यांना तिला पुन्हा एकदा अभिनय करताना बघायची इच्छा आहे. म्हणूनच ती पुन्हा एकदा मालिका क्षेत्रात कमबॅक होण्याची वाट पाहत आहेत.
आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान ही सुध्दा लवकरच त्यांची ही इच्छा पूर्ण करेल अशी आशा आहे. अभिनेत्री तेजश्रीला तिच्या हा नवीन निर्मातीच्या भूमिकेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.