महाराष्ट्रात सध्या मराठी अभिनय क्षेत्राला हादरवून टाकणारी घटना घडलेली ऐकायला मिळत आहे. लोकप्रिय कला दिग्दर्शक राजेश सापते यांनी शनिवार दिनांक 3 जुलै रोजी पुण्यात आत्महत्या केली होती. या घटनेमुळे अनेक कलाकारांना मोठा धक्का बसला असून.
अनेक कलाकारांनी राजेश यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी करीत आहेत. शनिवार दिनांक 3 जुलै रोजी राजेश सापते यांनी स्वतःचा व्हिडिओ बनवून त्यात लेबर युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. यामध्ये त्यांनी राकेश मोरया, गंगेश श्रीवास्तव, अशोक दुबे.
यांच्याकडून मानसिक त्रास होत असल्याने आत्महत्या करीत असल्याचे राजेश यांनी व्हिडिओ मध्ये म्हटले होते. झी मराठी वाहिनीवरील “अग्गबाई सुनबाई” या मालिकेसाठी राजेश सापते हे कला दिग्दर्शक म्हणून काम करीत होते. त्यामुळे या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी व्हिडिओ पोस्ट करून राजेश यांच्या कुटुंबीयाला न्याय देण्याची मागणी केली आहे.
राजू सापते यांनी अतिशय टॅलेंटेड माणूस गमविला असल्याचे व्हिडिओत म्हटले. “ज्यावेळी महाराष्ट्राबाहेर मालिकेची शूटिंग करावी लागली होती, त्यावेळी अवघ्या 4 दिवसात राजू दादा यांनी अग्गबाई सूनबाई मालिकेचे सेट उभा केले होते. राजू दादा सोबत असलेले कामगार 5 वर्षापासून त्यांच्या सोबत आहेत.
व त्यांनी कधीच कोणत्या कामगाराचे पैसे बुडविले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर लावलेल्या आरोपाचा शोध लावून योग्य तपास करायला हवा.” अशी विनंती निवेदिता सराफ यांनी सरकारकडे केली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.