पहा काय करतोय लहानपणीचा जुनियर जी

जी जेम जेमी बूम! याला वाचल्या नंतर आपल्याला काही आठवले का? आपला जन्म जर ९० च्या शतकात झाला असणार तर आपण लहानपणी बरेचशे TV शो पाहिले असतील, त्यापैकी एक म्हणजे जुनियर जी. बरेच जणांना आठवण असेलच. आठवण नसेल तर आपल्याला आठवून देतो कि ह्या शो ला सर्वात आधी डी.डी. नेशनल वर दाखविल्या गेले होते.

आले का आठवण? मग आले असणार तर आपल्याला ह्या शो मध्ये कोण कोण होत ते सुद्धा माहिती असेलच या शो मध्ये जुनियर जी नावाचा एक मुलगा होता ज्याचे नाव गौरव होते, आणि तो त्या नाटकामध्ये एक अनाथ मुलगा दाखवलेला असतो,

लहानपणीचा जुनियर जी आहे तरी कोण आणि करतो काय?
लहानपणी एकीकडे शक्तिमान लोकांच्या पसंतीचा शो समोर आला होता आणि त्यानंतर जुनियर जी नावाचा शो लहान मुलांना आवडायला लागला होता विशेष करून त्या नाटका मधील जुनियर जी चे पात्र पार पडणारा जुनियर जी नाटकामधील एक साधा भोळा मुलगा गौरव,

हा गौरव म्हणजे खरोखरच्या जीवनातील अमितेश कोच्चर. अमितेश आता खूप मोठा झाला आहे. एवढा मोठा कि त्याचे आता लग्न सुद्धा झाले आहे. त्याने स्वतःचे यु ट्यूब चे एक चॅनेल सुरु केले आहे, त्याचे हे यु ट्यूब चॅनेल एक ब्लॉगिंग चॅनेल आहे.

Amitesh Kochhar या चॅनेल मध्ये तो दैनंदिन जीवनातील अनुभव तसेच प्रवासाचे अनेक व्हिडीओ तो त्याच्या चॅनेल वर शेयर करत असतो. यु ट्यूब वर अमितेश चे बऱ्यापैकी सबस्क्रायबर आहेत. अमितेश त्याच्या सोशल मिडीया अकाउंट वर स्वतःची ओळख Ex Junior G म्हणून देतो.

याच अमितेश ने आपल्या लहानपणाला तेव्हा एक वेगळा आनंद दिला होता, आपल्याला अजूनही बरेचश्या गोष्टी आठवत असणार या विषयी. आज अमितेश मुंबई मध्ये आपल्या घरी राहतो, तो त्याच्या यु ट्यूब चॅनेल वर जुनियर जी वेळेस झालेल्या काही घटनांचा उल्लेख सुद्धा करताना दिसतो.

उल्लेख म्हणजेच त्याचा त्या वेळेसचा अनुभव कसा राहिला तेव्हा सेटवर कशी मजा आली या सर्व गोष्टीं त्याने यु ट्यूब चॅनेल वर शेयर केलेल्या आहेत. आपल्याला अजूनही त्याच्या विषयी जाणून घ्यायचे असेल तर आपणही त्याच्या यु ट्यूब चॅनेल ला भेट देऊ शकता. अमितेश चे अमितेश Vlogs नावाचे एक यु ट्यूब चॅनेल आहे.

आपल्या सर्वांचा लाडका जुनियर जी ज्याला ९० च्या शतकात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती ओळखत असेलच, त्याने लहानपणीच्या जीवनाचे काही दिवस आनंदमय बनविले.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *