भारतात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत मिळताना दिसून येत आहेत. आजपर्यंत या भयानक रोगाने लाखो लोकांना ग्रासले व त्यात लाखो लोकांना जीव देखील गमावावा लागला आहे. परंतु, अजूनही अनेकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
बऱ्याच ठिकाणी लोक अलोट गर्दी होताना दिसत आहे. सध्या एका लहान मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसून येत आहे. या व्हिडिओ मधील मुलाने असे काय केले जे पाहून नेटकरी त्याचे कौतुक करताना दिसून येत आहेत.
हा मुलगा धर्मशाळा येथील असून तो मास्क न घालणाऱ्या लोकांना काठीने मारताना दिसत आहे. तसेच, तो मास्क का घातला नाही म्हणून जाब देखील विचारताना दिसून येत आहे. धर्मशाळा येथील एका पर्यटन स्थळी हा लहान मुलगा पायऱ्या वर स्वतः मास्क घालून उभा होता.
अत्यंत गरीब घरातील हा मुलगा असून त्याच्या पायात चप्पल देखील दिसत नव्हती. परंतु, बेजबाबदारपणे बिना मास्क फिरणाऱ्या लोकांना हा चिमुकला एक प्रकारे धडाच शिकवीत आहे. या मुलाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून हे पाहून तरी लोकांना समज येईल का? हा प्रश्न पडत आहे.
एकीकडे सरकार व पोलीस प्रशासनाकडून मास्क न घालणाऱ्यांना दंड आकारताना दिसून येत आहे. परंतु, जनतेला आणखीन देखील समजत नाही की मास्क घालने हे स्वतः प्रमाणेच दुसऱ्याच्या आयुष्यासाठी अपायकारक आहे. काहीही असो सुशिक्षित लोकांसाठी या मुलाने दिलेली शिकवण कुतूहलाचा विषय ठरत आहे, हे नक्की.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.