आपले स्वामी महाराज करुणेचा सागर आहेत. स्वामींचे आपल्या बाळावर खूप प्रेम आहे. असेच एकदा चोलाप्पाची बायको नेहमीप्रमाणे काहीतरी काम करत होती. आवराआवर करत असताना तिला अचानक काहीतरी चावल्याचे जाणवले. काय चावले बघताच तिला विंचू आपल्याला चावला आहे असे तिला दिसते.
अचानक झालेल्या विंचवाचा दंश पाहून ती खूप घाबरुन जाते. आणि विंचू चावला विंचू चावला म्हणून मोठ मोठ्याने रडू लागते. त्या वेळेला तिथेच बाजूला स्वामी महाराजांची स्वारी स्वरूपानंदात रमलेले होते. चोलाप्पांच्या बायकोचे ओरडणे ऐकताच स्वामींनी तिज्याकडे बघितले. आणि बोलले काय झाले ग तेव्हा चोलप्पांची बायको बोलली स्वामी विषारी विंचू चावला.
असे बोलल्यावर स्वामी मोठ मोठ्याने हसायला लागले. आणि पायातले जोडे कडून तिच्याकडे फेकले आणि बोलले हा घे आमचा जोडा हातात घाल म्हणजे बरे वाटेल. स्वामी भक्तहो चोलप्पाच्या बायकोने स्वामींचा जोडा हातात घालताच चमत्कार झाला विंचवाच्या दनशाने होणाऱ्या तीव्र वेदना एकदम शांत झाल्या. आता हात थंडगार वाटू लागले.
तिला खूप आनंद झाला. आता माझा हात बरा झाला आहे. असं समजून तिने जोड्यातून हात बाहेर काढला. तोच पुन्हा हात वेदना करू लागला. आहाहा स्वामी भक्त हो काय समर्थांची लीला ही जोड्यात हात घालताच वेदना नाहीशा होतात. आणि जोड्यातुन हात बाहेर काढताच पुन्हा वेदना सुरू होतात. हे स्वामींची लीला बघताच चोलप्पच्या बायकोस आश्चर्य वाटले.
स्वामींच्या सामर्थ्याची तिला प्रचिती आली. त्यादिवशी स्वामिरायचा जोडा हातात घेऊन तो उशाशी ठेवून ती झोपी गेली. स्वामी भक्त हो अशी ही स्वामींची लीला या ठिकाणी समाप्त होत आहे. पण वेळ आहे आता स्वामी लीलेतून घ्यावयाच्या बोधाचे. आजच्या लीलेतून स्वामी आपल्याला प्रेरणा देत आहेत. ज्या प्रमाणे चोलप्पाच्या बायकोने स्वामींच्या जोड्यात हात घातला. तर विंचवाच्या दनशाच्या वेदना बंद झाल्या.
आणि हात बाहेर घेतला की वेदना व्हायच्या. त्यातून स्वामी आपल्याला प्रेरणा देतात की कितीही संकटे असुदेत स्वामींचे चरण घट्ट पकडुन ठेवायचे आहे. कारण जेव्हा आपण स्वामींचे चरण पकडतो. तेव्हा संपूर्ण शरण जाऊन अलंकार रहित कर्म करतो. तेव्हा आपण परम चैतण्याच्या सोबत ताळमेळ असतो. या निसर्गाच्या सृष्टीच्या हृदयाच्या ताळमेळ मधे असतो.
आणि या मुळे जीवनात योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळते. आपले निर्णय अचूक येतात. पर्यायाने यश मिळते. परंतु स्वामी भक्त हो जेव्हा आपल्याला यश मिळते. मग आलेल्या यशाचे श्रेय कळत न कळत स्वतःकडे घेते. म्हणजेच आपल्यात अहंकाराचा संचार होतो. आणि ज्या प्रमाणे चोळप्पाच्या बायकोने जोड्यातून हात बाहेर काढताच पुन्हा तुला वेदना होऊ लागल्या. अगदी तसेच स्वामींचे चरण सोडतो.
तेव्हा आपण स्वामिंपासून आपण दूर जातो. पर्यायाने आपले निर्णय चुकतात. आणि अपयश येते. थोडक्यात अहंकार निर्मित दुःख येऊ लागते. म्हणूनच स्वामी भक्त हो आजच्या लीलेतून आज आपणास आजच्या पिधीपासून बोध घेतात. वर्तमानातील कर्म अत्यंत प्रामाणिक आणि येकनिष्ठेने करणे स्वामी हुकूम आहे. आणि मन जागृत ठेवून सुख असो या दुःख मनात कोणताही अह्मभाव न ठेवता.
स्वामींचे चरण घट्ट पकडुन ठेवायचे. चला तर मग आज आपण आपल्या अंतिमनाशी नी संवाद करूया. हे मना सुख असुदे या दुःख असुदे कुठलाही अहमभाव मनात ठेवू नको. स्वामी चरण घट्ट पकडुन ठेव. बघ तुला सुखाचे सुख भेटेलच. पण दुःखाच्या वेदनांचा त्रास होणार नाही. हाच स्वामी रायांचा महिमा आहे. चला तर प्रेमपूर्वक सर्व जण बोलूया.
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कल कोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो स्वामींच्या अशाच बोधतमक लीला यापुढेही तुम्हाला पहायला भेटणार आहेत.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.