नमस्कार, तुझ्या इश्काचा नाद खुळा या मालिकेमध्ये रघुची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता संचित चौधरी सोबत नुकताच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबतीत घडलेला सर्व प्रकार त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले आहे. यात अभिनेता संचितने म्हणले की, काल खूप खतरनाक हिस्सा झाला.
नागपूर वरून प्लेनने मुंबईला आलो आणि एअरपोर्ट वरून ऑटो केली आणि शूटिंग करिता मढ आईलेंड ला जायला निघालो. ऑटो मध्ये माझी एक ट्रॉली बॅग आणि माझ्याजवळ एक साईड पौच होता. रस्त्यात यारी रोडला रिक्षा थांबवली कारण ए टी एम मधून पैसे काढायचे होते. ऑटो मधून उतरलो ट्रॉली बॅग तिथेच ऑटो मध्ये ठेवली आणि साईड पाऊच घेऊन ए टी एम मध्ये शिरलो,
पैसे काढले आणि बाहेर पडलो. तर बॅग बरोबर ऑटो गायब. माझी इतकी फाटली. पहिले पाच मिनिट मला बिलीवच होत नव्हतं की खरच ऑटो तिथे नाहीये. खूप पळालो, मागे पुढे, सगळीकडे ऑटोवाल्याला खूप शोधलो. ऑटोचा नंबर नव्हता. फक्त ऑटो कसा दिसतो आणि ऑटोवाला विथ मास्क कसा दिसतो इतकचं माहिती होतं. मग लगेच पोलिसांना बोलावून घेतलं.
त्यांनी आल्या आल्या लगेच आजूबाजूला असलेले सी सी टी वी चेक केले पण तिथल्या कुठल्याच कॅमेरा मध्ये ते कॅपचर होऊ शकलं नाही. मग त्यांनी मला जवळच्या पोलिस स्टेशनला म्हणजे वर्सोवा पोलीस चौकीत एफ आय आर करायला सांगितला. मी लगेच वर्सोवा पोलीस स्टेशनला गेलो. जाताना रस्त्यात खूप प्रे करत होतो की काहीही करून बॅग सापडू दे वगैरे कारण बॅगेमध्ये फक्त कपडेच नाही.
तर माझं पासपोर्ट आणि बँकेचे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट होते. पोलिस स्टेशनला आलो आणि आत जातच होतो तर मला पोलीस स्टेशनच्या बाहेर तिचं सेम रिक्षा दिसल्यासारख वाटली. मी जवळ गेलो कन्फर्म करायला. ऑटो होती पण ऑटोवाला आणि बॅग नव्हती. मला तिचं रिक्षा असल्याचं कन्फर्म झालं. मी लगेच आत गेलो आणि त्याचं काही न ऐकता पोलिसांना सांगायला लागलो.
की ती रिक्षा आहे ज्यात माझी बॅग चोरीला गेली होती, ती रिक्षा अत इथेच बाहेर आहे वगैरे. मी खूप एक्सायटेड आणि खुश झालो होतो एकाचवेळी. त्यांनी मला शांत केलं, बसवलं आणि सांगितलं की त्यांनीच त्या ऑटोवाल्याला पकडुन इथे आणलय आणि तुमची बॅग पण आमच्याकडे आहे. त्यांनी बॅग लगेच मला दिली. मी बॅग उघडून पाहिली.
आणि नंतर…नंतर माझी स्माईल बघून कळतच असेल तुम्हाला. सो बेसिकली मला खरच खूप एक्सायटेड होत बॅग मिळणे. बट थँक्यू टू मुंबई पोलीस. त्यांच्यामुळे माझी बॅग मला परत मिळाली. मी गेल्यानंतर पण एफ आय आर व्हायच्या आधी त्यांनी त्या चोरीला सिरीयसली घेतलं आणि त्याला मी स्टेशनला पोहोचायच्या आत पकडलं. भारी वाटलं.
अशाच सर्व पोलीस ऑफिसर्सला आपला थँक्यू आणि हँड्स ऑफ. अल्सो ते सगळे ऑफिसर्स सिरियलचे आणि रघुचे फॅन्स निघाले त्यामुळे त्याचा पण एक आनंद झाला. तर अशाप्रकारे अभिनेता संचित चौधरी याने त्याच्यासोबत घडलेला हा धक्कादायक प्रकार शेअर करत मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.