जाणून घ्या स्वाभिमान या मालिकेतील पूजा बिरारी बद्दल

नमस्कार, सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवर चालू असलेली मालिका स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच पसंतीस पडत आहे. या मालिकेतील पल्लवी हे पात्र प्रेक्षकांना आवडत आहे. आज आपण पल्लवी हे पात्र साकार करणाऱ्या अभिनेत्री बद्दल जाणून घेणार आहोत.

पल्लवी हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीच नाव आहे पूजा बिरारी. पूजाचा जन्म ९ ऑगस्ट १९९६ ला झाला. तिने कॉम्प्युटर सायन्स मधून आपले शिक्षण केले आहे. त्यानंतर तिने अभिनयाला सुरुवात केली.

घरातून तिला अभिनयाच्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी पाठींबा होता. सकाळने आयोजित केलेल्या एका ब्युटी काँटेस्ट मध्ये ती विजेती ठरली होती. ब्युटी ऑफ महाराष्ट्र कडून तिला किताब मिळाला होता.

ती आपल्याला झी युवा वरील साजना या मालिकेमध्ये दिसून आली होती. या मालिकेत तिने रमा हे पात्र साकार करताना आपल्या अभिनयाचा कस लावला होता. या मालिकेत एक प्रेमकथा होती. रमाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

त्यानंतर ती पुन्हा एकदा झी युवा वरील ऑलमोस्ट सुफळ संपुर्ण या मालिकेत दिसून आली. पुजाने या मालिकेत नचिकेतच्या ऑस्ट्रेलियाची मैत्रीण ही भूमिका उत्तम पद्धतीने साकारली होती. या मालिकेत तीला एका मॉडर्न मुलीच्या अभिनयामध्ये दाखवण्यात आलं. सध्या ती पल्लवी ही भूमिका साकार करते आहे.

स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतील हरहुन्नरी पल्लवी तेवढी जिद्दी आणि शिक्षिका होण्याच्या तिच्या स्वप्नाकडे वाटचाल करणारी अशी एक मुलगी दाखवण्यात आली आहे.

एका छोट्या गावात लहानाची मोठी झालेली पल्लवी आणि तिचं शिक्षिका बनण्याचे स्वप्न पूर्ण करताना या मालिकेमध्ये दिसणार आहे. पल्लवी भविष्यकाळात हे ध्येय गाठते का? अनेक रंजक वळणातून स्वाभिमान ही मालिका उलगडणार आहे.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *