नमस्कार सध्या कलर्स मराठीवर चालू असलेली मालिका शुभमंगल ऑनलाईन आणि या मालिकेतील अभिनेता सुयश टिळक हा आपल्या चाहत्यांसाठी आज एक आनंदाची बातमी घेऊन आला आहे. ती म्हणजे त्याने खास अवचीत्य साधून आपला साखरपुडा झाल्याचे सांगितले आहे.
त्यांने एका पोस्टच्या माध्यमातून आपला साखरपुडा आयुशी भावे तिच्यासोबत संपन्न झाल्याची बातमी चाहत्यांना दिली. त्याने आज आयुशी हीचा वाढदिवसा निमित्त ही पोस्ट शेअर केली आहे. सुयशने आपल्या इंस्टाग्राम मध्ये लिहले आहे.
माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सुंदर बनवणारी स्त्री हॅपी बर्थडे लव आणि त्याने ही पोस्ट आयुशी भावेला टॅग केली आहे. तुझ्याबरोबर माझे आयुष्य पूर्ण झाले आहे आणि मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी सुंदर जीवनासाथी मिळाली.
मला सांगताना आनंद होत आहे की, आम्ही आता ऑफिशियल एंगेज झालो असून सर्व प्रियजनांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने एक नवीन प्रवासाला सुरुवात करत आहोत. जुलै महिन्याच्या सुरुवातीला हा साखरपुडा पार पडल्याच समजत आहे. या दोघांनी साऊथ इंडियन स्टाईल मध्ये या सोहळ्याचे खास फोटो शेअर केले.
आयुशीने देखील खास फोटो पोस्ट केले आहेत आणि त्याचबरोबर अतिशय कॅप्शनही लिहले आहे. तो म्हणाला हॅपी बर्थडे आणि मी ही म्हणलं. सुयश सध्या आपल्या शुभमंगल ऑनलाईन या मालिकेत दिसून येत आहे.
याआधी तो आपल्याला का रे दुरावा या मालिकेमध्ये दिसून आला होता. त्याचं काम आणि त्याचा अभिनय यामुळे प्रेक्षकांमध्ये तो अल्पावधीतच प्रसिद्ध झाला. तर या नवीन दांपत्याला आणि त्यांच्या या एंगेजमेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.